प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात खाजगी बसद्वारे होणार वाहतूक

27

🔸जिल्हा प्रशासनाची वाहतूकदार संघटनांशी चर्चा

🔹तालुकानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11नोव्हेंबर):-परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या धर्तीवर जिल्ह्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी विविध संघटनांशी चर्चा केली. प्रवाशांच्या हितासाठी या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे प्रशासनाला आश्वासित केले.

या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे,वाहतूक विभागाचे रंजीत घोडमारे, परिवहन कार्यालयाचे आनंद मेश्राम, पोलीस निरीक्षक विशेष शाखा रवींद्र शिंदे तसेच स्कूल बस प्रतिनिधी जोशना गुंडे, महेश गौरकर, खाजगी बसचालक संघटनांची प्रतिनिधी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बस संपाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्ह्यातून वेगवेगळ्या मार्गांवर साधारणता 253 वाहतुकीच्या बसेस काळीपिवळी खाजगी बसेस कार्यरत होत्या. प्रवाशांची प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर सध्या उपलब्ध खासगी बसेस व अन्य वाहनांच्या तुलनेत या रस्त्यावर ज्या रस्त्यावर व दुर्गम भागांमध्ये प्रवाशांची अडचण होत आहे व तुलनेने कमी खासगी वाहने कार्यरत आहेत तिथे वाहतूक विभाग परिवहन विभाग यांनी समन्वय आणि वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश या बैठकीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले .

संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने चंद्रपूर येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. संपाच्या कालावधीत प्रवाशांच्या असणाऱ्या अडचणी, शंकाचे निरसन करण्यासाठी 07172-272555 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात

आज पार पडलेल्या बैठकीमध्ये मार्गाचे नाव, प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या ट्रॅव्हल्स सेवा व वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर-चिमूर मार्गावर दर अर्ध्या तासाने सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामायण बालाजी व रजा ट्रॅव्हल्स प्रवाशांना सेवा देतील. चंद्रपुर-ब्रह्मपुरी मार्गावर प्रत्येक 1 तासांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामायण ट्रॅव्हल्स, चंद्रपूर-नागपूर मार्गावर डीएनआर, बीटीपी, बागडी, गणराज, महाकाली, रामायण व योगीराज ट्रॅव्हल्स तर चंद्रपूर-मुल-गडचिरोली मार्गावर कोमल,दुर्गा ट्रॅव्हल्स प्रत्येक 1 तासांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सेवा देईल. वरोरा-चिमूर मार्गावर दर अर्ध्या तासाने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत चिमूर क्रांती ट्रॅव्हल्स तर दर अर्ध्या तासांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी येथे खाजगी गाड्यांची व्यवस्था त्या त्या मार्गावर करण्यात आली आहे. राजुरा-गडचांदूर-कोरपना येथे काळी-पिवळी खाजगी वाहने उपलब्ध आहेत. चंद्रपूर-जिवती व चंद्रपूर-घुगुस-वणी या मार्गावर खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

*तालुकानिहाय नियुक्त समन्वय अधिकारी :*

भद्रावती-वरोरा येथे विजय साळुंखे, मुल-सिंदेवाही-नागभीड व ब्रह्मपुरी येथे विलास ठेंगणे, गोंडपिपरी-बल्लारपूर येथे निलेश भगुरे, राजुरा गडचांदूर येथे गोविंद पवार, कोरपना-जिवती येथे विशाल कसंबे हे मोटार वाहन निरीक्षक तर चंद्रपूर येथे नरेंद्रकुमार उमाडे, घुगुस येथे विष्णू कुंभलकर या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या सेवा समन्वय अधिकारी म्हणून करण्यात आल्या आहेत. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.