नगर – मनमाड महामार्गा वर नांदेसर शिवारात दोन मोटर सायकलचा भिषण अपघात

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.12नोव्हेंबर):- नगर – मनमाड महामार्गा वर नांदेसर शिवारात दोन मोटर सायकलचा भिषण अपघात झाला आहे रात्री ९ वाजेच्या सुमारास हॉटेल् साई सावंत च्या समोर दोन मोटर सायकल मध्ये अपघात झाला आहे.

राजू भाऊसाहेब येवले अंचलगाव तालुका कोपरगाव व सुनील गोविंद कुलपे हल्ली राहणार लोणी व त्यांच्या पत्नी असे तिघे जण जखमी झाले आहे या जखमींना खाजगी रुग्णवाहिनी द्वारे उप जिल्हा रुग्णालय येवला व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची माहिती येवला पोलिसांना मिळताच पोलिस घटना स्थळी हजर झाले आहे व पुढील कार्यवही सुरू असल्याची माहिती पोलिस हवालदार कांदलकर यांनी दिली आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED