डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा कार्यालयाचे शानदार उद्घाटन

27

✒️लातूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लातूर(दि.12नोव्हेंबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या लातूर जिल्हा कार्यालयाचे नुकतेच शानदार असे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, मुरुड तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, ऍड उदय दाभाडे, श्रीकांत चलवाड, सुनील कांबळे, रवी बिजलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी केक कापून डी. टी. आंबेगावे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी संपादक, पत्रकार व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देत असून आपण सर्वांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले.

पत्रकारांना न्याय मिळवून देणे, त्यांचे हक्क अबाधित ठेवणे, पत्रकारांचे कल्याण करणे, पत्रकारांच्या कुटुंबांना सहकार्य करणे, पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवणे याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम संघटना महाराष्ट्रभर राबवित असल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील महिला पत्रकार संघटनेत उत्कृष्ट कार्य करीत असून संघटनेसोबत अनेक महिला पत्रकार जोडणार असल्याचे राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांनी प्रतिपादन केले. लातूर जिल्ह्यातील ऍक्टिव्ह पत्रकारांना सोबत घेऊन येत्या काही दिवसांत पत्रकारांची एक मोठी फळी संघटनेत उभी करणार असल्याचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे व संतोष सोनवणे यांनी आपले मत व्यक्त केले.