एचएएल वसाहतीतील बंद पडलेला रस्ता खुला करण्याचे निफाड प्रांत अधिकारी यांचे आदेश

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.12नोव्हेंबर):-ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे मुंबई-आग्रा महामार्ग गेट क्रमांक एक मरिमाता गेट सुकेना रस्ता हा वापरण्यासाठी खुला करावा असा महत्वपूर्ण निकाल निफाड प्रांत अधिकारी डॉक्टर पठारे अर्चना यांनी दिला सुकेना सह 10 गावातील जनता विद्यार्थी शेतकरी व्यावसायिक वर्ग यांना मोठा दिलासा मिळाला आहे ओझर येथील कंपनीचा प्रश्न प्रवेशद्वार गेट क्रमांक एक ते मरीमाता गेट सुकेना रस्ता प्रशासनाने बंद केला होता परिसरातील मोठी गैरसोय होत होती याबाबत येथील नागरिकांनी एच ए चल कंपनीच्या निर्णयाविरुद्ध निफाड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फौजदारी खटला दाखल केला.

हा रस्ता चालू होण्याकरिता खेरवाडी येथील एडवोकेट संदीप केदु पवार व त्यांच्या पत्नी एडवोकेट तेजल संदीप पवार यांनी कुठलाही मोबदला न घेता एचएएल कंपनीच्या विरोधात हा खटला चालविला गावकऱ्यांच्या बाजूने निकाल मिळवून दिल्याने दोघांचे अभिनंदन राष्ट्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील उपाध्यक्ष डॉक्टर राजेश साळुंके राज्य महासचिव रमेश देसाई उत्तर महाराष्ट्र संघटक शांताराम भाऊ दुनबळे नाशिक जिल्हा वक्ते राजेंद्र आहेर प्रदेश संघटक विजय केदारे यांनी एडवोकेट यांचे अभिनंदन केले