बँकेतून पीक कर्जाची फाईली गहाळ होते कशी

44

🔹शेतकऱ्यांना पडला प्रश्न

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12नोव्हेंबर):-तालुक्यातील एकमेव राष्ट्रीयीकृत बँक भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथे असुन या बँकेत बचत गटाचे खाते. ग्रामपंचायतचे खाते. जिल्हा परिषद शाळेचे खाते. इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे खाते. या तालुक्यातील लहान मोठे व्यावसायिक तथा शेतकरी शेतमजूर व इतर अनेक लोकांनचे व्यवहार या राष्ट्रीयीकृत भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथुन होते. इतर बँके प्रमाणे या बँकेतून शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामासाठी पीककर्ज वाटप करण्यात येते. शेतीचा पेरणीचा हंगाम संपला शेतातील पिके काढण्यात आली आता पर्यंत काही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही एकीकडे निसर्गाच्या कचाट्यात शेतकरी सापडला या वर्षी जास्त पाऊस झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांनचे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली शेतकरी हवालदिल झाला आणि दुसरीकडे पीककर्जासाठी बँकेचे वारंवार चकरा माराव्या लागत आहे. काही शेतकऱ्यांना आज पर्यंत कर्ज उपलब्ध झाले नाही पण एक शब्द पीककर्ज घेण्याऱ्या शेतकऱ्यांच्या कानी पडत आहे की तुमची फाईल मिळाली नाही गहाळ झाली आहे. आता तुम्हाला कर्ज मिळत नाही तारीख निघून गेली पुढच्या वर्षी बघू पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्या मध्ये चर्चा सुरू आहे की मॅनेजरच्या हाताखाली काम करणारे खाजगी बाहुले आहे त्यानां दक्षिणा देण्याची बोलनी झाली की लगेच फाईली मिळते पीककर्ज लगेच मंजूर पण होते अशी चर्चा सुरू आहे.

अशी पण चर्चा रंगु लागली आहे की बँकेतून एक पैसा गहाळ होत नाही पीककर्जाची फाईल कशी बँकेतून गायब होते? बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असुन सुद्धा फाईली गहाळ होत असेल तर बँक व्यवस्थापन संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. फाईली कशी गहाळ होते याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे त्या खाजगी कर्मचाऱ्यांनी पाच- सहा महिन्या पासून पीककर्ज घेण्याऱ्या शेतकऱ्यांन सोबत मोबाईलवर संपर्क साधला त्या काॅल डिटेलची चौकशी करून पर्दाफाश करा खुप मोठा कबाळ बहार निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे चौकशी होते की चौकशी पण गहाळ होते या कडे परिसरातील सुशिक्षित नागरिक तथा शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे