संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा आनंद वृद्धाश्रम, पालघर येथे वाढदिवस साजरा

✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पालघर(दि.13नोव्हेंबर):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मा.डी. टी. आंबेगावे सरांचा १० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वाढदिवस साजरा केला जातो. डी. टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसाचे आयोजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि वृद्धाश्रमातील वृध्दांप्रती आपले प्रेम व्यक्त करता यावे या दृष्टीने सरांचा हा वाढदिवस पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त पालघर येथील आनंद वृद्धाश्रमातील सर्व वृद्धाना सकाळचा नाष्टा देण्यात आला. शिवाय तांदूळ व इतर साहित्यांची मदत करण्यात आली.

याप्रसंगी पालघर जिल्हाध्यक्ष राजेश संखे, अमेय पिंपळे, संतोष कोरे, परेश संखे, जितेंद्र सावे, संजोग संखे, मुकेश सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोरे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचाली विषयी सर्वाना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संपूर्ण पालघर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. शेवटी आनंद वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ.मनीषाताई कोटक यांनी या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED