कोळीवाडे “गावठाण प्रस्ताव “ही आमची जबाबदारी!

33

आगरी कोळी भंडारी कराडी गाबीत ईस्ट इंडियन या सागर पुत्रांची,गावठाण जमीन हक्काची चळवळ म्हणजे सवर्ण जमीनदार जाती विरुद्ध ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया असा थेट संघर्ष आहे.आम्हाला अर्थात शूद्र ओबीसींना जमीन मालकी मिळू नये असे तत्वज्ञान ज्या वैदिक हिंदू मनुस्मृतीच्या तत्त्वज्ञानाने मांडले, त्या गटारातच डुबक्या मारणाऱ्या ओबीसींना हे कसे कळावे?कसे समजवावे?. यासाठीच पुन्हा पुन्हा लिहावे लागते बोलावे लागते.
“S.R.A”अर्थात गलिच्छ वस्त्या असे आमच्या कोळीवाडा गावठाणे याना महाराष्ट्र सरकाने, म्हटल्यानंतर ज्यांना संताप येत नाही ? ते मेलेल्या मूडदयांच्या अवस्थेत, पोहचलेले आहेत.अर्थात स्वाभिमानी लोकांची कमतरता हेच आमच्या ओबीसींच्या विनाशाचे खरे कारण आहे.वैदिक हिंदुत्वाच्या नशेत धुंद झालेल्या माझ्या जात बांधवाना ही जीवघेणी लढाई कशी सांगावी? हा माझ्या समोरचा मोठा यक्ष प्रश्न आहे?

मराठा ब्राह्मण सीकेपी या उच्चवर्णीय जमीनदार सत्ताधाऱ्यांची शासनातील मक्तेदारी ही आमची शत्रू असेल तर सरकारवर विश्वास दाखविणे म्हणजे छत्रपती शिवरायांनी भटजींप्रमाणे उघड्या अंगाने अफजल खानास भेटणे होय.शत्रूस आत्मसरक्षक चिलखते आणि हत्यारबंद होऊन भेटणे ही छत्रपतींची युद्धनीती आम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. अफजलखाणी वृत्तीचे दगलबाज सत्ताधारी मुबंईतल्या मंत्रालय,सिडको,एमआयडीसी, महानगर पालिकेच्या प्रशासन आणि राज्यकर्त्यांमध्ये बसले आहेत.महाराष्ट्राच्या सर्वच गावठाण जमिनी मध्ये मोठमोठे वाडे, गढ्या बांधून कोण रहात होते?तेथे मागास वर्गीय स्त्रिया,शेतमजूर यांच्यावर अत्याचार करणारे कोण होते? आदिलशाही निजामशाहीत हीतील प्रशासक मुसलमान नाही तर उच्चवर्णीय हिंदूच होते ना? या गद्दार दलाल (हिंदू) देशमुख देशपांडे यांच्या गढ्या उध्वस्त करणारे छत्रपती शिवराय आमच्या सुशिक्षित तरुणांनी वाचले पाहिजेत.मोघलांच्या मुस्लिम सत्तेतील रयतेचे शोषण करणाऱ्या हिंदू गोचिडाना पायाखाली चिरडणारे छत्रपती शिवराय पुरंदरे सारखे ब्राह्मण मराठा भाट कधीच सांगणार नाहीत?

हा आम्हा ओबीसी आगरी कोळी भंडारी तरुणांच्या अभ्यासाचा विषय आहे.आज सगळ्यात हॉट आणि महागड्या जुहू मुंबईत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख,केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,सचिन तेंडुलकर,अमिताभ बच्चन आणि शरद पवार,राज ठाकरे उद्धव ठाकरे या “भूचर “जमीनदारांच्या आलिशान बंगल्याची निर्मिती कशी झाली असेल याचा अभ्यास करा. मुबंईचे मूळ मालक असलेले आगरी कोळी भंडारी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी यांच्या गावठाणांना हेच लोक झोपडपट्ट्या अर्थात “SRA”ठरवून त्या बिल्डरला द्यायला का निघालेत?महाराष्ट्रातील जमीनदार जातींनी अर्थात मराठा ब्राह्मण सीकेपी यांनी रयतेच्या स्वराज्याला विरोध केला होता.हे स्वराज्यातील आणि आदिलशाही निजामशाहीत असलेल्या प्रशासनाचा अभ्यास केल्यावर समजून येते. शिवाजी महाराजांना आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या या जमीनदार उच्चवर्णीय सत्ताधाऱ्यावर विस्वास नव्हता?. हे कधीही फितुरी करून रयतेच्या स्वराज्याच्या विचाराला संपवून टाकतील.या भीतीनेच महाराष्ट्राचा घाटमाथा सोडून त्यांना सागरपुत्र आगरी कोळी कराडी कुणबी भंडारी यांच्या रायगडात आपली राजधानी बनवावी लागली.

देशातील ओबीसी विरोधातील हा मनुस्मृतीच्या विषमतेचा शोषक विचार समजून घेतला तो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी.म्हणूनच छत्रपती शिवरायांचे सागरी आरमार जे आमच्या सागरपुत्र आगरी कोळी भंडाऱ्याचे,गाबीत कराडी मुस्लिम यांचे होते ते आरमार “मराठा आरमार” असूच शकत नाही. अर्थात पेशव्यांच्या ब्राह्मण मराठा सरदारांनी इंग्रजांची मदत घेऊन ते बुडविले. कोकणातील मागास वर्गीय मुस्लिम यांनी उभारलेल्या आरमाराला बुडविणे म्हणजेच रयतेचे स्वराज्य बुडविणे होय.यानंतरच्या पेशवाईत अतिशूद्र शूद्र आणि स्त्रिया यांच्यावर जे अत्याचार झाले ते मोघल राजवटीलाही लाजविणारे होते.यावर आंबेडकरी साहित्यिक इतिहासकार चांगली माहिती देतील.अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर ही वैदिक हिंदू विषमता महाडच्या चवदार तळे पाणी हक्कांच्या आंदोलनातून जगासमोर आलीच नसती. यानंतर कोकणातल्या आगरी कोळी,कुणबी (मराठा नव्हे)भंडारी,कराडी आदिवासी एससी जातींना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चवर्णीय खोती सावकारी विरोधात कुळांच्या जमीन हक्कांचे आंदोलन केले.त्यामुळेच आम्हाला कसायला जमीन आणि आमच्याच गावातील घरांचा मालकी अधिकार मिळाला.

1 एप्रिल 1957 ला आम्हास या भारतीय राष्ट्राचा सातबारा अधिकार देणारा “संविधानिक राष्ट्रवाद” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्मास घातला.जो सारे शंकराचार्य, सावरकर,डॉ हेडगेवार, गोळवलकर गुरुजी बाळासाहेब ठाकरे अटलजी अडवाणी यांनी आजही स्वीकारलेला नाही.या कुलकायद्याच्या विरोधात आजची शिवसेना महाविकास आघाडी भाजपा आणि छोटे मोठे उच्चवर्णीय बुवा बापू दादा नाना हे अध्यात्मिक गुरू ही काम करतात.कारण हे मूळचे खोत सावकार आहेत. आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियनाच्या जमीन हक्कांच्या विरोधात सारे उच्चवर्णीय एव्हढ्या संघटितपणे काम करतात त्यात पानिपत कादंबरी लिहणारी विस्वास पाटील यांच्या सारखी मराठा ब्राह्मण आयएएस मंडळी मुबंईत जिल्हाधिकारी असतील तर ?सरकार आमची गावठाणे अचूकपणे मोजेल? यावर तुम्ही विस्वास ठेवत असाल ?तर तुमच्या या अंधश्रद्धा, अंधभक्तीला मीही वंदन करावे ? असे तुम्हास वाटत असेल तर ते अशक्य आहे.अशा मुर्खपणास मी आत्मघातच म्हणेन आणि आपल्या बांधवाना सावध करिन.म्हणूनच आमच्या कोळीवाडा गावठाणांचा प्रत्येक कोपरा प्रत्येक चौरस सेंटीमीटर आम्ही आमच्या हाताने मोजला पाहिजे.

कोकणातील बेदखल कुळे,सेझ प्रकल्प,सिडको एमआयडीसी यांच्या विरोधातील ओबीसी मागास वर्गीयांच्या आणि मातृसत्ताक महिलांच्या जमीन हक्काचे आंदोलन चालवीत असताना मी गावठाण हक्क आंदोलन छेडले. ते मुबंईत “कोळीवाडा गावठाण चळवळ” म्हणून विधानसभेत चर्चेलाही आले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील,आमदार आशिष शेलार,कॉग्रेसचे भाई जगताप यांनी त्यावर उत्तम चर्चा केली.महाराष्ट्र शासनाच्या पुढील निष्क्रिय कपटी धोरणाचा अंदाज येताच खासदार बॅरिस्टर ओवेसी आणि माजी खासदार Adv बाळासाहेब आंबेडकर या देशातील अल्पसंख्याक मागासवर्गीयांच्या नेत्यांच्या सहकार्याने शिवजीपार्क येथे भव्य सभा घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यास लाजविणारी ओबीसी परिषद फक्त सागरपुत्र आणि मागासवर्गीयांच्या गावठाण जमीन हक्कासाठी घेतली.आमचे सीमांकन गावठाण हक्क शासनाने मान्य केले.अर्थात लोकवर्गणी काढून आमच्या वाहिवाटी तील,वापरातील जागा आम्ही मोजू,त्यांचे नकाशे आम्ही बनवू ,हा कुळ हक्कांच्या दाव्यात येणारा, जमीन हक्कांचा दावा असेल ,तर आमच्या जमिनी आम्ही मोजून ,त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ना ना पाटील यांच्या प्रमाणे लढविल्या पाहिजेत. त्यासाठी ,म्हणजेच चौदाशे कोटी रुपयांचे एक गावठाण अशी दोनशे गावठाणे असतील तर..1400 कोटी गुणिले 200 एव्हढ्या महागड्या जमिनी आणि जोडून असलेल्या बंदरे मासे सुकविण्याच्या जागा आणि सागरिहक्कांसाठी केव्हढा पैसा आणि मानवी शक्ती,राजकीय सामाजिक इच्छाशक्ती लागेल? यासाठी मी संघटन बांधण्यास सुरुवात केली.

यावरून पुढे “आम्ही कशाला खर्च करायचा?” आम्ही कधी पैशाला हातही लावला नाही,आमचा समाज गरीब आहे? असा सवाल आमच्या महिला अध्यक्षांनी उज्वलाताई पाटील यांनी केला.मला वाटले त्याच्यातील प्रामाणिक स्त्री बोलत असावी.पुढे जाऊन जेव्हा प्रल्हाद वरलीकर आणि डॉ गिरीश साळगावकर यांनी माहीम कोळीवाड्यात स्वतःच्याच जमीन हकांच्या विरोधात वक्तव्य केले .या कोळीवाड्याच्या जमिनी नावावर होणारच नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा या चांगल्या संघटनेत वैचारिक फूट पडली. मुबंई ची मुख्य विरोधक शिवसेनेच्या ताब्यातील महानगर पालिका, बिल्डर एसआरए आर्किटेकत लॉबी, उच्चवर्णीय राजकीय नेत्यांनी आमची संघटना हायजॅक केलीय.आता डॉ शिरोडकर मासळी मार्केट बिल्डर एसआरए साठी खाली करून देणारी लिखित पत्रे आमच्या महिला नेत्यांनी दिली असल्याचे खेदजनक कृत्य समोर आले आहे.

मला आशा आहे यात कोणताही आर्थिक गैरव्यवहार नसावा?. हे आमच्या भोळ्या सुशिक्षित महिलांना फसवणूक करून लिहून घेतलेले आहे.अर्थात याच प्रकारे नवी मुबई विमानतळ प्रकल्पग्रस्त मच्छीमारांची फसवणूक आजी माजी आमदार खासदार यांनी सुद्धा केलीय,लोकांना फसवून अशी “कबूलायत” लिहून घेणे ही जुनी उच्चवर्णीय खोती सावकारी परंपरा आहे.नवी मुबंईत आगरी कोळी संघटनेचे उच्चशिक्षित तरुण अर्थतद्न्य,मा निलेश पाटील यांनीही गावठाण चळवळीसाठी लाखोंचा भव्य मोर्चा, सिडको विरोधात काढला होता.नवी मुंबईच्या लोकांनी फार मोठे समर्थन आणि प्रेम त्यांना दिले.

परंतु गावठाण प्रस्ताव तयार करणे, त्यासाठी गाव कमिटी आम्ही केली पाहिजे, हे त्यांना आजही मी समजावू शकलो नाही? हे “माझे “अपयश आहे. मुबई ठाणे रायगड जिल्ह्यात तरुणांना फसविणारी बिल्डर भूमाफिया राजकीय लॉबी प्रचंड आक्रमक झालीय.आज जमेची बाजू अशी की मा. मनोज माशेलकर ,युवा नेते जयेश आकरे सुंदर पाडमुख, राजकुमार कांबळे,मा देवेंद्र तांडेल,मार्शल कोळी,प्रा भावेश वैती,किरण पाटील,सरपंच सौ रेश्मा शरद ठाकूर,साहित्यिक प्रा चन्द्रकांत मढवी,शेकाप नेते जीवन गावंड ,विकास पाटील ,मा दशरथ भगत.राज पाटील,गौरव म्हात्रे रुपेश धुमाळ विकास कोळी अशी उच्चशिक्षित मंडळी लढाईत उतरलीत. परंतु आमचे जमीन हक्कात विरोधक असलेले पारंपरिक शत्रू कोण?

जमीन हक्कांचा अत्यन्त अवघड असलेला हा संघर्ष चालविण्यासाठी संविधानिक,संसदीय लढ्यानप्रमाणेच लोकनेते दि बा पाटील यांच्या पाच हुतात्म्यांचा त्याग ,नेहमी स्मरणात ठेऊन, फार सावधपणे छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीने, आम्ही ही लढाई स्वतःच्या मनगटातील शक्तीवर लढवली पाहिजे.मला पूर्ण विश्वास आहे माझ्या आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन बांधवांचे सर्व गैरसमज दूर करून ,प्रसंगी माझ्यावर झालेली टीका ,माझ्याकडून अनवधानाने झालेल्या चुका सुधारून,प्रसंगी अपमान सहन करून ही चळवळ आपण सर्वजण निश्चित यशस्वी करू.मातृसत्ताक आई एकविरा आम्हास प्रज्ञा म्हणजेच शहाणपण देईल ! ही सदिच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो.

✒️सुलोचना पुत्र.राजाराम पाटील(गावठाण चळवळीचे प्रस्तावक.अभ्यासक.संघटक)मो:-८२८६०३१४६३