स्वतंत्र म्युन्सिपल म्युन्सिपल कामगार युनियन देवळी नगर परिषदची शाखा गठित

26

✒️देवळी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

देवळी(दि.13नोव्हेंबर):-देशातील सर्व महानगर पालिका,नगरपालिका नगरपंचायत, नगरपरिषद मधील संघटीत असंघटीत कामगारांचे मोठ्या प्रमाणत शोषण होत आहे.त्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने जनजागृती करून त्यांना संघटीत करण्याचा प्रयन्त होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकर नगर, देवळी, जिल्हा वर्धा येथे स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य महासचिव माननीय डी.एम.खैरे यांच्या अध्यक्षते खाली महत्वपूर्ण सभा घेण्यात आली त्यावेळी मान गणेश उके राज्य संघटक स्वतंत्र मजदूर युनियन,मान.निशा चौधरी महिला विंग राज्य महासचिव स्वतंत्र मजदूर युनियन,मान धनंजय कलसे सचिव वाडी नगर परिषद स्वतंत्र मुन्सिपल कामगार युनियन, प्रशांत रामटेके राज्य अध्यक्ष गवंडी बांधकाम मजदूर युनियन, यांच्या उपस्थितीत देवळी नगर परिषद कामगारांची सभा संपन्न झाली. सभा मध्ये कामगार कर्मचारी यांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर सविस्तरपणे चर्चा झाली.

त्यावेळी स्वतंत्र मजदूर युनियन चे ध्येय धोरण सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात कामगारांना समजावून सांगीतेले. त्यांनतर स्वतंत्र मुन्सिपल कामगार युनियन देवळी नगर परिषद की शाखा गठित करण्यात आली.स्वतंत्र मुन्सिपल कामगार युनियन देवळी नगर परिषदच्या अध्यक्ष पदी ओंकारेश्वर महादेवराव मुडे,कार्याध्यक्ष- सुरज दिलीपराव धोंगडे, उपाध्यक्ष- गजानन वासुदेवराव करलुके, सचिव- शेख अकील जरील फारूक, संघटन सचिव- विलास मारोतराव शेंदे कोषाध्यक्ष- रवींद्र जयरामजी नांदणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेला देवडी नगपरिषद कामगार कर्मचारीमोठय संख्येने उपस्थितीत होते. ओंकारेश्वर महादेवराव मुडे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास मारोतराव शेंदे यांनी आभार मानले.