






✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.13नोव्हेंबर):– चंद्रपूर जिल्ह्याच्या मानीकगड पहाडावरील शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणार्या जिवती तालुक्यातील मुख्य मार्ग म्हणजे शेणगाव, पाटण ते गडचांदूर रस्ता आहे अनेक ठिकाणी केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहने चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने साधे पायी चालनेही शक्य नाही.रस्त्यात जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहने चालविने धोक्याचे झाले आहे . परंतु त्यांना माहीत नसते की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे ,गिट्टी जमा झाली आहे.तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे. समोरून मोठी वाहन आल्यानंतर सर्वत्र धूळ पसरते त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना गिट्टीतून वाहन घालवावी लागते. रुग्ण व गर्भावती स्त्रियांना दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वेळावेळी या रस्त्यासाठी संबंधित विभागाला सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या वतीने वर्तमानपत्राच्या माध्यमातून व निवेदनाद्वारे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप या मागणीची संबधित विभागाचे अधिकारी व या क्षेत्रातील जनप्रतिनिधीने गांभीर्याने दखल घेतली नाही. रस्त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहे. संबंधित विभाग आणि जनप्रतिनिधी लोकांनची अपघात होऊन मृत्यूची वाट बघत आहे की काय अशी या क्षेत्रातील जनता बोलत आहे आता आमच्या सहनशिलतेची मर्यादा संपली आहे. यामुळे आमच्या रोषाला संबंधितांना सामोरे जावे लागेल. शेणगाव,पाटण ते गडचांदुर रस्ता त्वरित दुरुस्त करावा
अशी मागणी जोर धरू लागली आहे





