डोंगरी जन परिषदेच्या वतीने लाईट पुरवठा रितसर करण्यात यावा यासाठी तहसीलदार व उप अभियंता यांना निवेदन देण्यात आले

66

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13नोव्हेंबर):-डोंगरी भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लोडशेडींग न करता दिवसाला बारा तास लाईट पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे डोंगरी जन परिषदेच्या वतीने उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयात दि. २२:११:२०२१ रोजी पासून महामुक्काम आंदोलन केले जाणार आहे ,गेल्या दोन वर्षांपासून डोंगर भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास लाईट पुरवठा करण्यात यावा म्हणून आंदोलने केली जात आहेत, परंतु लाईट खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दरवर्षी मोकळी आश्वसने देवुन डोंगरी भागातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याने चालू रब्बी हंगामात लोडशेडींग बंद करून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास लाईटचा पुरवठा करण्यात यावा.

म्हणून डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांचे उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयात महामुक्काम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन गंगाखेड तहसीलदार व उप अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालय गंगाखेड यांना देण्यात आले असुन निवेदनावर डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे ,आश्रोबा दत्तराव सोडगीर ,पंडित निवृत्ती सोडगीर, बालासाहेब प्रभाकर सोडगीर ,दादासाहेब खांडेकर, शंकर रुपनर, आप्पासाहेब रुपनर, गोविंद नीळकंठ मुंडे, बालासाहेब रंगनाथ सोडगीर, पद्माकर मरगीळ, योगेश फड, भगीरथ फड ,बालाजी किसनराव मुंडे ,बापुराव भालेराव, विवेक मुंडे ,जगन्नाथ मुंडे ,बालासाहेब गुट्टे ,सीताराम देवकते ,बाबुराव नागरगोजे ,भास्कर सांगळे ,दशरथ मोटे ,विनायक दहीफळे, केशव भेंडेकर आदी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.