गोळेगावचे युवा किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे यांचे झी टॉकीजवर किर्तन सेवा

25

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.13नोव्हेंबर):- तालुक्यातील जातेगाव नजीक गोळेगावचे युवा किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे याचे दि 14/11/2021 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत झी टॉकीज या मराठी वाहिनीवर किर्तन प्रसारीत करण्यात येत असल्याने ह भ प सुनिल महाराज काळे यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे

गेवराई तालुक्यातील जातेगाव नजीक गोळेगावचे भुमीपुत्र युवा भागवताचार्य किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे वानगाव फाटा येथील वारकरी संस्थेत शिक्षण घेत आहेत ह भ प सुनिल महाराज काळे यांचे दि 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये झी टॉकीज या चॅनेल वरती श्री गुरु बंकट स्वामी महाराज वै. शांतीब्रम्ह गुरुवर्य रामहरी बाबा तसेच गुरुवर्य पंडित सुभाषजी देशमुख गुरुजी व महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य मृदंग विशारद पंडित विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने झी टॉकीज या लोकप्रिय वाहिणीवरती कीर्तन सेवा होणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी पाहायला विसरू नका असे आवाहन करण्यात आले असुन हे भ प सुनिल महाराज काळे यांचे झी टॉकीजवर किर्तन सेवा होत असल्याने मा सुनिल दादा धाडे,भारुडकार विष्णु महाराज बाडे,ह भ प हरिदास भाऊ जोगदंड ,प्रा.नाना म.कदम उद्योजक अनुरुद्र गोरे ,मा सरपंच गोविंदराव काळे, भाऊसाहेब काळे , युवा पत्रकार गोपाल भैय्या चव्हाण, देवराज कोळे,सुनिल मिसाळ, आप्पासाहेब महाराज, गणेश महाराज,ढिगाबर महाराज ,उमेश महाराज,राजेद्र महाराज,विनायक महाराज,ओकार कागदे,अंकुश महाराज काळे, पाठक महाराज आदींनी केले आहे