गोरगरिबांची लालपरी वाचवा

देशातील सर्वात मोठी परिवहन सेवा म्हणुन जिचे सर्वात जास्त सन्मानाने नांव घेतल्या जात होते ती महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा म्हणजेच एसटी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील जनतेस पुरेशी, किफायतशीर, नियमित व कार्यक्षम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व खेड्यांपर्यंत सेवेद्वारे पोहोचलेले देशातील एकमेव राज्य परिवहन महामंडळ आहे. महामंडळ राज्याच्या जनतेस तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी असलेल्या २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा देत आहे.पण म्हणतातना “कुपनच शेत खाते” त्याप्रमाणे आजच्या घडीला एस टी तील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या कामगार संघटनांनी आर्थिक हितसंबंध टिकविण्यासाठी एसटी महामंडळ खुळखुळे करून खासगी बस वाहतुकीला रान मोकळे करून दिले.

गावागावात एस टी वेळेवर पोचत होती.विध्यार्थी,शेतकरी,शेतमजूर गावातून जवळच्या शहरात वेळेवर पोचून आपला उद्योग धंदा,शिक्षण घेत होता.त्याला वेळेवर सेवा देणारा कामगार अचानक कसा काय बदलला?.खेड्यातून शहराकडे जाणारा प्रवाशी काळी पिली खाजगी वाहने कसा काय वापरू लागला.प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २x२ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसन व्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. प्रवाशांचे आकर्षक ठरलेल्या शिवनेरी या वातानुकूलित बसेसच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. या शिवाय ३२ आसनी मिडी बसेस ग्रामीण व अतिदुर्गम भागात लोकप्रिय झाल्या असून या बसेसच्या संख्येत वाढविण्याच्या भविष्यात करण्यात येणार आहे. बसताफा अधिक कार्यक्षम असणाऱ्या दृष्टीकोनातून बसेसचे आयुर्मान १० वर्षावरुन ८ वर्षे करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे व याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.तीच खासगी वाहतूक करणाऱ्यांना डोकेदुखी ठरणारी होती.त्यामुळेच मान्यताप्राप्त राजकीय कामगार संघटनांनी कामगारात असंतोष पेरण्याचा काम करून सलग सेवा देण्याऱ्या कामगारांना बंड करण्यास भाग पाडले.कामगार कर्मचारी अधिकारी यांच्यात व्यक्तिगत आणि राजकीय मतभेत वाढून वैचारिक दरी निर्माण झाली.त्यामुळेच सर्वांच्या आचरणात फरक पडला.

एकाबाजूला प्रवाशांना राज्य परिवहन सेवांकडे आकर्षित करण्यासाठी तसेच आज जी वाहतूकीशी समारोप स्पर्धा करण्यासाठी प्रवासाभिमुख असलेल्या वार्षिक सवलत कार्ड, मासिक पास,त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास इत्यादी योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. येत्या काही महिन्यांत प्रवाशांना तिकिट देण्यासाठी इलेक्ट्रीक तिकिट इश्यु मशीनचा वापर राज्यातील सर्व वाहकांमार्फत केला जाणार आहे. तसेच सुमारे २१५ महत्वांच्या बसस्थानकांवरून संगणकीय आरक्षण सुविधा नजिकच्या काळात विस्तारीत करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जानेवारी २०१० पासून इ-तिकिट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर मोबाईल वरुनही आरक्षण याचा पर्याय प्रवाशांना महामंडळाने उपलब्ध करुन दिलेला आहे.त्यामुळेच प्रवाशात वाढ होत असतांना कामगारांनी अचानक संप का पुकारला हा प्रश्न निर्माण होत आहे.

बसेसची स्वच्छता, सेवेची नियमीतता, सौजन्यशील वागणूक, अपघात विरहीत व सुरक्षित सेवा यासाठी महमंडळ सातत्याने प्रयत्नशील असतांना.

प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महामंडळ कटीबद्ध असतांना. राज्यात किफायतशीर, सामान प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी महामंडळास सातत्याने प्रोत्साहन देणारा कामगार कर्मचारी अधिकारी अचानक कसा काय बिथरला. बहुसंख्य प्रवाशी सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी एस.टी.नेच प्रवास करतात.

गाव तिथे एस टी म्हणजे स्वर्गातून सफर घडविणारी गोरगरिबांची लालपरी आहे.मुंबईत सुरक्षित नोकरी करीत असतांना ग्रामीण भागातील असंघटीतांना संघटीत करण्यासाठी किल्लारी भुकंपा नंतर मला संपूर्ण मराठवाड्यात लालपरीने फिरवणारे कालकथीत एन डी (बाबा) सोनावणे मुकाम पोस्ट डोंगरकिणी तालुका पाटोदा,जिल्हा बीड,एन जी ओ क्षेत्रातील मान्यताप्राप्त समाजसेवक.आंबेडकरी विचारांचे क्रांतिकारी लढाऊ नेते.मराठवाड्यातील एक ही एस टी डेपो नाही जिथे बाबाची ओळख नाही.प्रत्येक डेपोतील कर्मचारी अधिकारी यांचे टेबल वरील फोन बाबाच्या डायरीत नोंद असे.कष्टकरी गोरगरीबांची,आणि गळ्यात सबनम झोळी घेऊन फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची दळणवळण करणारी लालपरी आज राजकीय कामगार संघटना आणि खाजगीकरणाच्या युती आघाडी मुळे धोक्यात आली आहे.ती प्रवाश्यांनी आणि जागृत कामगारांनी एकत्र येऊन वाचवली पाहिजे.कामगारांचा संप आहे.आपल्याला काय देणेघेणे असा विचार प्रवाशांनी करू नये.आणि सरकार मराठी माणसांचे नही किंवा हिंदूंचे ही नाही तर ते भांडवलदारांचे आहे आणि असते, कायम लक्षात ठेवावे. कामगार कर्मचाऱ्यांनी नेतृत्व करून कामगारांनी शासनकर्ती जमात बनावे.सत्ताधार्यावर कायम दबाव ठेवावा. असे भारतीय घटनाकारी देशाला राजकीय घटना देतांना सांगितले होते.हे आपण विसरतो म्हणूनच ?????.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)अध्यक्ष- सत्यशोधक कामगार संघटना सलंग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य(मो:-९९२०४०३८५९)

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED