भीम आर्मी चा एस टी कर्मचाऱ्याच्या संपाला जाहीर पाठिंबा.!

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्यातील जीवन वाहिनी एस टी परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर आजपर्यतच्या कालावधीत या मंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांचेवर आर्थिक गुलामगिरीचा फास आजपर्यंत सुरूच आहे.अहोरात्र कष्ट करूनही त्यांना पुरेसे वेतन दिले जात नाही,त्यांच्यामुळे त्यांना योग्य रीतीने कौटुंबिक उदरनिर्वाह होईल.राज्य शासनाच्या जनहिताच्या सर्व योजनांची अंमलबजावणी एस टी परिवहन महामंडळ करते मात्र एस.₹ टी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी त्यांना खूप कमी प्रमाणात वेतन देण्यात येते.त्यांचा हा लढा महामंडळाच्या स्थापनेपासून सुरूच आहे.कमी वेतणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.महाराष्ट्राच्या जीवनाहिणीत काम करणाऱ्या कष्टकरी कर्मचारी व अधिकार्यावर जो कमी वेतनाचा प्रश्न राज्यसमोर उभा आहे.

तो राज्यशासनाने तात्काळ सोडवावा यासाठी एस टी कर्मचाऱ्यांना भीम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.व प्रशासनाने जर एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न केल्यास भीम आर्मी तर्फे चक्काजाम व जन आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा वजा देण्यात आला.!एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देते वेळेस भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष श्याम देवकुळे,जिल्हा महासचिव धनराज कांबळे,शिवाजी गाडे,आकाश नेटके,मंगल कांबळे,सचिन वाढवे,दिलीप चंदन इत्यादी कार्यकर्त्यांसहित संपावर बसलेले कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.!