दोंडाईचा झोतवाडे येथील गणेश रवींद्र सदाराव (वय २५) यांच्या गुढ आजचे बद्दल समिती व खासदार यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी

🔹वाल्या सेना ग्रुपच्या वतीने निवेदन देण्यात आले

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.13नोव्हेंबर):- झोतवाडे येथील गणेश रवींद्र सदाराव वय २५ हा तरूण दि.९/११/२०२१ सकाळी ६:००वा सुमारे मंदाने गावातील तुकाराम महाराज मंदिर येथे मृत्यू अवस्थेत आढळून आला व त्याची चप्पल तेथून थोड्या अंतरावर पिप्पळ चौरस येथे आढळून आली त्या सोबत असलेल्या पंकज भरत ठाकरे झोतवाडे या गणेश या सोबत असलेला साथीदार बॅटरी अंगावर पडून मुर्त्यु झाला असे सांगत आहे.

तर त्या ट्रॅक्टरची बॅटरी आहे तो सुनील माधवराव पाटील राहणार मंदाने हा बॅटरी उचलून ठेवण्याचे सांगत आहे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये पोट, पट,कमरेकडे मार लागलेले रिपोर्ट दर्शवत आहे.त्यामुळे गोरगरीब मजूर करणाऱ्यास मयत गणेश रवींद्र कोळी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सौ.गीतांजली ताई व वाल्या सेने ग्रुपचावतीने दोंडाईचा पोलीस स्टेशनचे मा. पो. निरीक्षक दुर्गेश तिवारी साहेब व सचिन गायकवाड साहेब आणि योगेश पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी झोतवाडेतील महिला व पुरुष उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED