एसटी कामगारांचा कुटुंबीयांसह गेवराई तहसीलवर मोर्चा

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-907591314

गेवराई(दि.13नोव्हेंबर):-येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी(ता.११) सकाळी गेवराई तहसीलवर मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

त्यामुळे राज्यभरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. एवढे होऊनही सरकार या समस्यांवर तोडगा काढत नसल्यामुळे गेवराई बसस्थानकातील कामगारांनी कुटुंबातील सदस्यांसोबत गेवराई तहसीलवर मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED