राष्ट्रीय ओबीसी व किसान मोर्चाच्या वतीने धरणगाव तहसीलला धरणे आंदोलन

29

🔸१० डिसेंबर, २१ रोजी भारत बंद पुकारणार – आबासाहेब राजेंद्र वाघ

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.14नोव्हेंबर):- केंद्र सरकारने जाती आधारित जनगणना तसेच ओ.बी.सी. ची जातनिहाय जनगणना न करण्याचे ठरविले आहे त्याचे विरोधात, केंद्र सरकारने बनविलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विरोधात, खाजगी क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी तसेच जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागु करण्यासाठी आज दि.१२ रोजी राष्ट्रीय पिछडा वर्ग ( ओ.बी.सी. ) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे देशातील ३१ राज्य, ५५० जिल्हे तसेच ५ हजार तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय “ राष्ट्रव्यापी चरणबध्द आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने धरणगाव येथे तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.

यानंतर नायब तहसिलदार जे.पी.भट साहेबांना निवेदनाची प्रत देण्यात आली. राष्ट्रव्यापी चरणबध्द आंदोलनाचा हा तिसरा टप्पा असुन चौथ्या टप्प्यात दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच वरिल मागण्या मान्य न झाल्यास दि. १० डिसेंबर २०२१ रोजी “ भारत बंद ” ची हाक आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

आंदोलना प्रसंगी राष्ट्रीय ओ.बी.सी. मोर्चा राज्य सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुका संयोजक गोरखनाथ देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन, जिल्हा सचिव सिराज कुरेशी, बामसेफ तालुकाध्यक्ष पी.डी. पाटील, जिल्हा महासचिव हेमंत माळी, प्रोटॉन संघटनेचे ता.उपाध्यक्ष विलास कढरे, ता. महासचिव आकाश बिवाल, बुद्धिस्ट इंटरनेशनल तालुकाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष मोरे, विकल्प फाऊंडेशनचे लक्ष्मणराव पाटील, आदिवासी पारधी समाजाचे राज्याचे नेते विनोद चव्हाण, समर्पण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष महेंद्र तायडे, मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते दानिश मोमीन, रिझवान मोमीन, निसार अहेमद, सुनील लोहार, राहुल मराठे, यांचेसह राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ( ओबीसी ) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. धरणे आंदोलन प्रसंगी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोना. मिलिंद सोनार, पोकॉ.वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव, शामराव भिल, पोना.चालक गजेंद्र पाटील आदी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी सहकार्य केले.