पानगाव चैत्यस्मारक भूमीत ‘अशोक स्तंभ’ पायाभरणी सोहळा संपन्न

73

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतीनीधी)मो:-9763463407

अंबेजोगाईदि.14नोव्हेंबर):-मराठवाड्याची चैत्यभूमी म्हणून संबोधले जाणारे ता. रेणापुर जिल्हा-लातूर येथील पानगाव या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यस्मारक ही भव्य-दिव्य वास्तू उभारली असून महाराष्ट्रातील मुंबई-दादर चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी व पानगाव चे चैत्यस्मारक यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. या वास्तू मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आंबेडकरी अनुयायांची हे ठिकाणे चेतनास्थळे आहेत. काल दिनांक १४ नोव्हेंबर रोजी अशोक स्तंभ पायाभरणी सोहळा संपन्न झाला.

पुणे येथील अशोक सर्वांगीन विकास सोसायटी यांच्या सौजन्याने या संस्थेचे कालकथित डॉ. अशोक शीलवंत यांच्या जयंतीनिमित्त पानगाव येथे अशोक स्तंभ भूमिपूजन झाले होते.या संस्थेचे कार्याध्यक्ष आयु. राजरत्नं शिलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाची सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या जीवन कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविते यात अशोक स्तंभ निर्मिती हा महत्त्वाचा उपक्रम असून, सम्राट अशोकाने 14 शिलालेखांचे निर्मिती केली होती. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, याचे महत्त्व लक्षात घेऊन ते चीरंकाल टिकावे म्हणून त्या त्या ठिकाणी 14 अशोक स्तंभ उभा करणे, संस्थेद्वारे संकल्प करून आतापर्यंत देशातील ८ ठिकाणी स्तंभ उभारणी झाली असून, पानगाव या ठिकाणी ९ वा अशोक स्तंभ उभारण्यात येत आहे.

या स्तंभाची उंची ५२ फूट एवढी असून तो लवकरच पूर्ण होईल असे संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. राजरत्नं शिलवंत यांनी प्रत्येक्ष भेट देऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष मा.व्ही. के. आचार्य यांना आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. चंद्रचूड चव्हाण (मा. कृषी सभापती) ईश्वर गुडे, (मा. जि.प सदस्य) मुन्ना गुर्ले (चेअरमन सेवा सोसायटी) व्ही के आचार्य (अध्यक्ष चैत्य स्मारक ट्रस्ट पानगाव ) वैभव आचार्य(सचिव) या संस्थेचे पुणे येथील सत्येसेन सिरसाठे, राजकुमार ढेंगळे, इम्रान मनियार,(ग्रा. प. सदस्य) गुलाब चव्हाण, कुलभूषण संपते, कीशोर चक्रे (भा. बौद्ध महासभा) सिध्देश्वर गालफाडे, मारुती गालफाडे यांची उपस्थिती होती. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम.बी.कांबळे, आनंद आचार्य, अर्जुन दांडे, मेजर महादू आचार्य, जयदीप आचार्य, राहुल कासारे, मंगेश आचार्य आदींनी परिश्रम घेतले.