भु-वैकुंठ आत्मनुसंधान अड्याळ टेकडी येथे पालखी पदयात्राचे आगमन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14नोव्हेंबर):- भु- वैकुंठ आत्मनुसंधान अड्याळ टेकडी(ब्रम्हपुरी) येथून 14 आँक्टोंबर 2021 ला पालखी पदयात्रा गुरुकुंज मोझरी करीता प्रस्थान झाली होती. दि. 24 आँक्टोंबर 2021 ला मोझरी येथे पालखी पोहोचली व ब्रम्हलीन वंदनीय राष्टसंत श्री. तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहून 26 तारखेला पालखी परत निघाली. व विविध गावा-गावांमध्ये प्रचार प्रसार करीत , पालखीचे संपूर्ण प्रवास पार करून, सुखरूप काल दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोज बुधवारला भु- वैकुंठ अड्याळ टेकडी येथे पालखी पदयात्रेचा आगमन झाले आहे.

सामुदायीक प्रार्थनेनंतर पालखी पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सुबोधदादा मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकडी, श्री. बन्सोड गुरुजी ब्रम्हपुरी, सौ. स्नेहलताआई, सौ. बेबीआई इ. मान्यवर उपस्थित होते.

श्री.युवराज भाऊ बोरकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्री. पारधी बावाजी, दिनकरजी सहारे, सौ. बेबीआई काकडे, सुश्री. रेखाताई, डॉ.नवलाजी मुळे गुरुजी, श्री. बन्सोड गुरुजी इत्यादी मान्यवरांनी आपले पालखीचे अनुभव व मार्गदर्शन केले. त्यानंतर पालखीचे पंच कमिटीचे, पालखी प्रमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आदरणीय सुबोधदादा यांचा समारोपीय मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आला. श्री.सुभाष भाऊ बोरकर पालखी प्रमुख यांनी पालखीचा संपूर्ण जमा खर्च सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कुळे व आभार प्रदर्शन विशाल वैद्य यांनी केला.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED