मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन–विवेक कुचेकर

25

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.14नोव्हेंबर):-मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने आवाज उठवत आहेत मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली आहे सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष आशोक हींगे पाटील व बीड जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी बीड तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक(बाबा) कुचेकर यांनी केले आहे.

या भव्य धरणे आंदोलनातील मागण्या न्यायलयाने दिलेल्या 5 टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे ,
धार्मिक भावना भडकावुन समाजात तेढ निर्माण करणारयाना कठोर शिक्षा दैणारे पैगंबर मोहम्मद बील वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे ते बिल येणारया अधिवेशनात मंजुर करून तात्काळ तो कायदा लागू करावा,महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करून ईमाम,मुअज्जिन आणी खुद्दाम हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे तसेच संत विचाराच्या प्रचार प्रसार करणारया ह,भ,प,कीर्तनकार यांना शासनाकडुन मासिक वेतन सुरू करण्यात यावे.

वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवुन त्या जागेचा वापर अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी करावा, सारथी–बार्टी –महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यासाठी स्वतंञ प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी या सर्व मागण्यासाठी सोमवार 22 नोव्हेंबर 2021रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष आशोक हींगे पाटील, बीड जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी बीड जिल्हयातील सर्व मुस्लिम बांधवांनी या भव्य धरणे आंदोलनास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक (बाबा) कुचेकर यांनी केले आहे