पंडित जवाहरलाल नेहरू हे आदर्शवादी सिद्धांतिक प्रतिमेचे महानायक, हेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचे निर्माते – मा.आ. डॉ नामदेवराव उसेंडी  गडचिरोली

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.14नोव्हेंबर):-स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पंडीत जवाहरलाल ‘चाचा’ नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्य माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री पुडके सर यांनी साने गुरुजीची किवीता ‘या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार हि कविता म्हणून जयंती साजरी करण्यात आली. बालकदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ नामदेवराव उसेंडी बोलतांना म्हणाले कि, स्वतंत्र प्राप्तीनंतर पंडित नेहरूंनी सकारात्मक धोरणे राबवून देशाचा पाया मजबूत केला.

देशाला विज्ञान क्षेत्रात प्रगत बनवण्यासाठी पुढाकार घेतला. इंजि . अजमीरे यांनी सुद्धा चाचा नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी माजी आमदार तथा महासचिव महा. प्रदेश. काँग्रेस कमिटी डॉ नामदेवरावजी उसेंडी, जिल्हा समन्वयक हसनअली गिलानी, जी.प उपाध्यक्ष मनोहर पा. पोरटी, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार स्वयंरोजगार अध्यक्ष काशिनाथ भडके, पुडके सर, महासचिव घनश्याम वाढई, सचिव बाळू मडावी, शहर कार्याध्यक्ष आशिष कामडी, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, इंजि. संदीप आजमिरे, दयाराम जुमनाके, प्रभाकर कुबडे, रवींद्र कुमरे, वामन कुळमेथे, देवानंद नैताम दिवाकर मिसार, ढिवरुजी मेश्राम, प्रतीक बारसिंगे, सदाशिव कोडापे, पंकज खोबे, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, आदी बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बाळू मडावी यांनी केली आभार प्रदर्शन घनश्याम वाढई यांनी मानले.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED