आद्यक्रांती गुरू वीर लहूजी वस्ताद साळवे बहुउद्देशीय संस्था दाढी पेढी अमरावती यांच्या वतीने वस्ताद लहूजी साळवे यांची 227 वी जयंती उत्साहात साजरी

27

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.15नोव्हेंबर):-संपूर्ण भारतातील स्वतंत्र संग्रामातील कित्येक स्वातंत्र्य सेनानी घडविणारे एकमेव शूरवीर योद्धा,निडर,कुणाचीही भीती न बाळगनारे आणि प्रथम मुलींची पुण्यातील मुलींच्या शाळेचा पाठबळ व संरक्षण करणारे स्वातंत्र्य मिळण्या अगोदर इंग्रजांच्या काळातील पुण्यातील शनिवार वाड्यावर भगवा झेंडा फडकावनारे आद्यक्रांतीगुरु वीर वस्ताद लहूजी साळवे यांची जयंती ही संपूर्ण भारतातील वास्तव्याला असलेल्या मातंग समाज बांधव मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात.

तेव्हा दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी वस्ताद लहूजी साळवे 227 वी यांची जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे ग्राम दाढी पेढी येथील आद्यक्रांतीगुरू वीर वस्ताद लहूजी साळवे बहुउद्देशीय संस्था दाढी पेढी यांच्या वतीने जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.ज्यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांना महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून व लहान मुले यांच्या हस्ते केक कापून वस्ताद लहूजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी नव्यानेच सुरू झालेल्या साप्ताहिक संवाद क्रांती वृत्तपत्राचे संपादक बाळू कलाने तथा कार्यकारी संपादक राजू कलाने यांनी वस्ताद लहूजी साळवे यांची जयंती निमित्त अवचीत्य साधून साप्ताहिक संवाद क्रांती वृत्तपत्राचे विमोचन त्यावेळी कार्यक्रमा दरम्यान करण्यात आले.

तर साप्ताहिक संवाद क्रांती वृत्तपत्र हे एक वृत्तपत्र नसून फुले शाहू आंबेडकर चळवळ आधुनिक काळात सामाजिक ,निर्भिड आणि निःपक्ष एल्गार गावातील जातील प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून करणार असल्याचे ग्वाही त्यावेळी साप्ताहिक संवाद क्रांती वृत्तपत्राचे संपादक व कार्यकारी संपादक राजू कलाने यांनी त्यावेळी उपस्थित नागरिक तसेच मातंग समाज बांधव यांना दिली.

त्यावेळी या वस्ताद लहूजी साळवे यांच्या जयंती कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ.राधास्वामी काळे ओबीसी महासभा भात कुली तालुका अध्यक्ष,राजू कलाने,संस्थापक आद्यक्रांतीगुरू वीर वस्ताद लहूजी साळवे बहुउद्देशीय संस्था दाढी पेढी तथा जिल्हाध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना अमरावती जिल्हा , ज्येष्ठ नागरिक वामन तायडे , श्रीकृष्ण तायडे ,श्रीकृष्ण कलाने ,गजानन मानमोडे,अमोल मानमोडे,बाळू कलाने,मारोती कलाने,अंकुश तायडे,दुर्गेश तायडे,आकाश चव्हाण,अभिषेक कलाने, सोपान पचारे गजानन पचारे भावेश मानमोडे तथा महिला विमलबाई तायडे, बयनाबाई म.कलाने,नंदा तायडे, सरोजिनी तेलमोरे, जोत्सना मानमोडे,अंजली मानमोडे,मंदा कलाने,मंगला कलाने, प्रिया कलाने,जान्हवी तायडे,आरती चव्हाण, माया सिरसाठ, भूमिका कलाने,प्रणिता कलाने, परी कलाने,स्वरा कलाने, कांता पचारे इत्यादी महिला व पुरुष या जयंती कार्यक्रमात उपस्थित होते.