भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका अध्यक्षपदी यशवंत खुंटे यांची फेर निवड

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.15नोव्हेंबर):-भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हाध्यक्ष आद.व्ही.आर.थोरवडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १४ नोव्हेंबर रोजी राजे सिद्धार्थ बुद्ध विहार,शिरवळ ता.खंडाळा येथे तालुका कार्यकारिणीची निवड संपन्न झाली.नूतन तालुका अध्यक्ष म्हणून यशवंत आनंदा खुंटे यांची,महासचिव म्हणून संजय जाधव,कोषाध्यक्ष पदी नितीन कदम व संस्कार उपाध्यक्ष पदी गणेश खुंटे यांच्यासह २१ पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

निवड प्रक्रिया जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड साहेब व जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बारसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सातारा तालुकाध्यक्ष नंदकुमार काळे व खटाव तालुका सरचिटणीस अरुण रणदिवे यांनी नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.जिल्हा पर्यटन सचिव यशवंत अडसुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.