क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची गंगाखेड येथे जयंती साजरी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15नोव्हेंबर):- येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची मोठ्या उत्साहात 227 वी जयंती साजरी करण्यात आली.गंगाखेड येथील लहुजी साळवे चौक या ठिकाणी सकाळी अकराच्या दरम्यान शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत गुलालाची उधळण करून फटाके व अतिषबाजीच्या गजरामध्ये मोठ्या आनंदात लहुजी वस्तादांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पुढील नियोजित कार्यक्रम गंगाखेड येथील अण्णाभाऊ साठे चौक याठिकाणी आयोजित केला होता. तसेच शहरातील क्रांतिगुरू लहुजी साळवे नगर येथेही अभिवादन करण्यात आले.

पुढे अण्णाभाऊ साठे चौकातील नियोजित अभिवादन कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेसह सर्व महामानवांना पुष्पहार अर्पण करत क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन केले या अभिवादन कार्यक्रमास नगरसेवक चंद्रकांत खंदारे नंदकुमार पटेल, सुशांत चौधरी, जि.एच. वाघमारे, उद्योजक संजय पारवे, संजय आबा साळवे, इंतेसार सिद्दिकी, शेख उस्मान, राजेश जाधव, पत्रकार भागवत जलाले, पिराजी कांबळे, राजपाल दुर्गे, देवानंद गुंडाळे, डि.जी.मेकाले, मुंजाभाऊ अवचार, रोहिदास लांडगे, अतिश खंदारे, अमोल अवचारआदी जणांसह शहरातील अनेक विविध क्षेत्रातील व्यक्तींची अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती लागली होती.

तर हा अभिवादन कार्यक्रम समाप्तीनंतर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच गंगाखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणीही रुग्ण व नातेवाईकांसाठी जयंतीनिमित्त महाप्रसाद, फळांचे वाटप करण्यात आले वरील या सर्व कार्यक्रमास अतिशय सुंदर पद्धतीने यशस्वी करण्यासाठी युवा कार्यकर्ते अंकुश उर्फ बंटी कांबळे, विशाल अवचार, किरण उफाडे, दत्ता साळवे, ओमकार अवचार, डिगा अवचार आदींनी मोलाचे परिश्रम घेतले

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED