पुरस्कार भीक मागून तर स्वातंत्र्य रक्तरंजित क्रांतीतूनच मिळत असते- सौ.सुरेखा निकाळजे

24

✒️बुलडाणा प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.15नोव्हेंबर):-क्रांतिकारकांच्या त्याग आणि समर्पणाला लांछन लावणारी मानसिकता भारतीयांची नसूच शकते. त्यामुळेच आजही क्रांतिकारकांची,महानायकांची जयंती,पुण्यतिथी देशभर साजरी होत आहे. केंद्र सरकारचे काही पुरस्कार भलेही भिक मागून मिळत असतील परंतु स्वतंत्र रक्तरंजित क्रांतीतूनच मिळाले.असे मनोगत आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखा निकाळजे यांनी व्यक्त केले.बिरसा मुंडा, विर लहुजी साळवे, पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात सौ निकाळजे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.

स्थानिक आझाद हिंद संघटना, बहुजन महिला संघटना, मातृतिर्थ महिला संघटना, आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिकारक महानायकांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या संपर्क कार्यालयात 15 नोव्हेंबरला सायं. आयोजित केले होते.

आझाद हिंद महिला संघटनेच्या मोताळा तालुका अध्यक्ष सौ.यमुना खोटाळे यांच्या अध्यक्षतेत तर आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सतीशचंद्र रोठे, प्रदेश महासचिव संजय एंडोले, निवड समिती अध्यक्ष जफर शेख, कामगार संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष अकिल शाह, ज्ञानेश्वर घोटाळे, प्रदेश महिला संपर्क प्रमुख सुरेखाताई निकाळजे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामूहिक माल्यार्पण करून समयोचित विचार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. वर्षाताई ताथरकर, श्रीकृष्ण कोकाटे, नबू व्यवहारे, सुमन वखरे,कुसुमबाई हिंगणकर, उर्मिला कराळे,आशा कावळे, शोभा तायडे, कमलबाई असणे, देवकाबाई मिटकरी, कौशल्याबाई मिटकर,देवकाबाई सोनवणे, समाधान धनवे, पुंजाजी गायकवाड, समाधान इंगळे, मुजाहिद शाह यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन नलिनीताई उन्हाळे तर आभार प्रमिलाताई सुशिर यांनी व्यक्त केले.पसायदान आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.