कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा भीम आर्मीची मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.15नोव्हेंबर):-आपल्या विविध विवादास्पद वक्तव्यामुळे अडचणीत आलेली हिंदी सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिचा देशाचे मा.राष्ट्रपती यांनी नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला.

सदर अभिनेत्रीने चर्चेत राहण्यासाठी 1947 साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून इग्रंजाकडून मिळालेली भीक होती व खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले.असे अत्यंत विवादास्पद विधान करून देशातील भारतीयांना चीड आणणारे वक्तव्य एक दूरचित्रवाणीवरून केले.इंग्रजांच्या तावडीतून देश स्वातंत्र्य करण्यासाठी या मायभूमीतील कितीक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे कंगनाने देशातील वीरांचा,शहिदांचा अपमान केला आहे.त्यामुळे कंगना राणावतला मिळालेला पद्मश्री बहुमान परत घ्यावा व पुन्हा असे वेताळ व्यक्तव करणार नाही. यासाठी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेबांना यांना मा.उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या वतीने देण्यात निवेदन आले.यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,जिल्हा उपाध्यक्ष श्याम देवकुळे,जिल्हा महासचिव धनराज कांबळे,अजय लोखंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED