लहुजी वस्ताद हे राष्ट्रप्रेमाने भारावलेले ज्वलंत निखारा होते – माजी आ.भीमराव धोंडे

104

🔸आष्टी येथील भगवान महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंती संपन्न

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.15नोव्हेंबर):-आपल्या पूर्वजांच्या देशप्रेम आणि राष्ट्र हितासाठी झगडण्याच्या पूर्वापार परंपरेला साजेसे काम करणाऱ्या क्रांतीवीर लहुजी साळवे तथा लहुजी वस्ताद यांच्या क्रांतिकारी कार्याने सुप्रसिद्ध असलेले लहुजी राघोजी साळवे हे राष्ट्रप्रेमाने भारावलेले क्रांतिकारी निखारे होते अशा शब्दात आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी गौरवोद्गार काढले.आष्टी येथील भगवान महाविद्यालयांमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या जयंती निमित्त आज त्यांच्या प्रतिमेला नतमस्तक होत पूजन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचज अनुसूचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड,वाल्मीकतात्या निकाळजे,पत्रकार उत्तम बोडखे,शंकर देशमुख,प्रबोधन निकाळजे आदींसह मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार भीमराव धोंडे पुढे म्हणाले,क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांचे वडील राघोजी साळवे यांनी राष्ट्रकार्यासाठी आपले जीवन अर्पण केले.यापूर्वीही त्यांच्या कौटुंबिक पूर्वापार घराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही सैन्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांनी आपल्या वडिलांच्या आणि पूर्वजांच्या राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या पावलावर पाऊल ठेवून युद्धकलेचे सर्व धडे गिरवत स्वतःला झोकून दिले.

असे सांगून लहुजी वस्ताद हे आपल्या राष्ट्राचे खऱ्या अर्थाने क्रांती वीर आणि प्रेरणास्थान आहेत अशा शब्दात त्यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.यावेळी ॲड.वाल्मीकतात्या निकाळजे यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि लहुजी वस्ताद यांच्या कार्याचे कौतुक करत लहुजी वस्ताद हे आजही तरुण पिढीला राष्ट्रप्रेम निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका करणारे प्रेरणास्त्रोत आहेत असे ते म्हणाले.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख,दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक तथा वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी नतमस्तक होत अभिवादन केले आणि सर्वांचे आभार मानले.