संदेश सोशल मिडीयाचा वापर धार्मिक व सामाजिक भावनाचा भान ठेऊन वापर करावे- भंडारा पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.16नोव्हेंबर):-देशातील व महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने धार्मिक भावना भडकविणा-या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ / व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. अशाप्रकारच्या पोस्ट ऑडीओ / व्हिडीओ फॉरवर्ड करु नये. सामाजीक शांतता भंग करणे, समाज विघातक व्हिडीओ पोस्ट, संदेश, सोशल मिडीयावर वायरल करणे कायदयाने गुन्हा आहे. अशाप्रकारच्या पोस्ट/ व्हिडीओवर लक्ष ठेवण्याबाबत फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्टिटर, व्हॉट्सअॅप इत्यादी सर्व सार्वजनीक माध्यामांना कळविण्यात आले आहे.

सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करतांना सामाजीक भान ठेवत माहीती तंत्रज्ञान अधिनीयम सन 2000, (I.T. Act 2000 ) मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे. व्हॉट्सअॅप वापरणारे / ग्रुपमध्ये असनारे सर्व सदस्य विशेषतः ग्रुप अॅडमीननी आपल्या ग्रुपमधील सेटींगमध्ये जावुन (Only Admins) हे ऑप्शन सिलेक्ट करावे. तसेच अशाप्रकारचे पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारीत होणार नाहीत याची विशेष दक्षता घ्यावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. भंडारा पोलीस दलातर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारचे धार्मिक भावना भडकविणारे व खोटया बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये. तसेच अशाप्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट करतांना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर तसेच ग्रुप अॅडमीनवर प्रचलीत कायदयानुसार कडक कारवाई करण्यात येईल.