२० वर्षांनी उघडली शेगाव (बूज.) कृषी उत्पन्न बाजार समितीची दारे- शेतकऱ्यांना दिलासा

33

🔹आमदार सौ प्रतिभा ताई धानोरकर यांच्या हस्ते झाला शुभारंभ

✒️मनोज गाठले(शेगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-97678 83091

शेगाव(दि.16नोव्हेंबर):- वरोरा तालुक्यातील शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या पिकाची विक्री करणारी मुख्य बाजार पेठ संबोधल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती शेगावचे दरवाजे 20 वर्षांपासून बंद होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर सोसाड पडले होते.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन संचालक मंडळाने वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्याने बाजार समिती पुन्हा सुरु करण्यात यश आले, कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला.

स्मशान शांत असलेला बाजार समितीच्या परिसरात आता शेतकरी, व्यापारी, मापारी, दलाल, हमाल यांची रेलचेल वाढणार आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्या जात आहे.
आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराचे सभापती राजूभाऊ चिकटे यांच्या अथक परिश्रमातून शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजारपेठ पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत सज्ज झाली आहे.शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव बू येथील आज कापूस खरेदी विक्रीचा शुभारंभ आमदार सौ प्रतिभा ताई धानोरकर यांच्या हस्ते मोठ्या थाटाने पार पडला.

यावेळी आमदार धानोरकर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या, माझ्या वरोरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव यांच्या सुख सोई साठी मी सदैव प्रयत्न शील राहील व माझ्या कोणत्याही शेतकरी बांधवाची होणारी फसवणूक मी कधीही सहन करणार नाही याप्रसंगी शेतकरी बंधूचे शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

शुभारंभ दिनी कापूस विक्री करिता आलेल्या सर्व शेतकरी बंधूचा कापूस प्रती किंटल ८३११ रूपये प्रमाणे खरेदी करण्यात आला.
सर्व शेतकरी बंधूना बाजार समितीत योग्य भाव मिळेल असे बाजार समितीच्या पदाधिकारी यांनी सांगितले.कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा उपबाजार शेगाव बू उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूभाऊ चिकटे, उपसभापती देवानंद मोरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक बंडूभाऊ शेळकी, चंदू जयस्वाल, योगेश खामानकर तसेच तसेच गावातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्त यशवंत लोडे,तंटामुक्त गाव समितीचेअध्यक्ष महेश घोडमारें, राजूभाऊ लोणकर, प्रभाकर घोडमारे व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.