गेवराई गिरिजाशंकर जिनिंगमधील कापसाची चोरी; कापूस चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.16नोव्हेंबर):-कापसाला यंदा चांगला भाव आहे.यामुळे शेतातूनच कापूस चोरीचे प्रकार झाल्याचे एकन्यास मिळाले. परंतु बीड जिल्ह्यात चोरट्यांचा मोर्चा शेतीमालावर वळवला असून चक्क जिनिंगमधून कापूस चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. नेहमी सोनं, चांदी, वाहनं चोरणाऱ्या चोरट्यांनी, आता शेतीमालाकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळं शेतकऱ्यांसह धान्य व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ आळा घालावा. अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे

एक लाखाचा कापूस चोरीला

रात्री बाराच्या दरम्यान जिनिंगमधील 12 ते 14 क्विंटल कापूस चोरून चोरट्यांनी जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. तर हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सीसीटीव्हीत प्रकार कैद

बीड जिल्ह्यात चोरट्यांनी आता शेतीमालाकडे मोर्चा वळवला आहे. आतापर्यंत शेतातील गोठ्यातून शेतातून शेतीमाल चोरल्याच्या घटना घडत होत्या. मात्र आता गेवराईत चक्क जिनिंगमधील कापसावरचं चोरट्यांनी डल्ला मारला आहे. गेवराई परिसरातील महामार्गालगत असणाऱ्या, गिरिजाशंकर जिनिंगमधील कापसाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केलीय.

क्राईम खबर , महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED