धनज येथे जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

31

✒️सिद्धार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.16नोव्हेंबर):- धनज येथे प्रज्ञासूर्य अभ्यासिका वर्ग येथे जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या१४६ व्या जयंतीनिमित्त सोमवार १५ नोव्हेंबर रोजी अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ वनिता देवानंद पाचपुते ह्या होत्या. प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील बापूराव धनवे, तंटामुक्ती अध्यक्ष आनाजी बोंबले,जेष्ठ नागरिक शेख मुस्तफा शेख चांद, चरण डोंगरे, ग्रामसेवक बि.डि. भांगे, तलाठी जि.एस.मोळके, आदी मंचावर उपस्थित होते. चरण डोंगरे व नासर देशमुख यांनी जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक बि.डी. भांगे ग्रामसेवक यांनी केले.

सूत्रसंचालन अमोल जोगदंडे यांनी तर आभार प्रदर्शन जयराम कराळे यांनी मानले .यावेळी गावातील सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते . देवानंद पाचपुते, संजय झाटे,प्रविण वाळले, दतप्रसाद जाधव,राजाराम वाळके,विष्णू चव्हाण,संभाजी जोगदंडे, रंगराव राठोड , माहादु अशोले , नामदेव गव्हांडे ,राघो झाटे, हरि व्यवहारे, सखाराम वाळके, दिगाबंर साबळे, विठ्ठल चव्हाण, माधव वाळले,रामजी डोंगरे पुंजाजी वाळके,देविदास डोंगरे,पुंजाराम गायकवाड, सुरेश डोंगरे ,व्हणाजी कोते,रघुनाथ व्यवहारे, अमोल अमले, प्रदीप धनवे ,गोपाल वाळके, हरी वाळके ,विवेक धनवे, विरेन डोंगरे, बालाजी बोंबले , समाधान आमले, विनायक व्यवहारे,सखाराम गायकवाड आदी उपस्थित होते.