वर्षभर व्यसनमुक्त रहा;तिरुपती दर्शनाचा योग

27

🔸मालेवाडी सरपंचाचे व्यसनमुक्तीसाठी अभियान; पंकजा मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.16नोव्हेंबर):-भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे दसरा मेळाव्यात व्यसनमुक्तीचे आवाहन केले होते.यानुसार मालेवाडीच्या सरपंच सौ.वैशाली बदने व भुराज बदने यांनी आपले गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.गावातील व्यक्ती सर्वच व्यसनापासून वर्षभर दुर राहणार्या व्यक्तीस स्वखर्चाने तिरुपती बालाजीचे दर्शन घडविण्याचे अभियान हाती घेतले असुन यास ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.व्यसनाधीनतेमुळे आजची पिढी अनेक व्याधीने ग्रस्त झालेली आहे.ग्रामीण भागातही तंबाखू,विडी,दारु अशा व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

5000 हजार लोकसंख्या असलेली मालेवाडी ग्रामपंचायत व्यसनमुक्त व्हावी असा निश्चय करत भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मालेवाडीच्या सरपंच वैशाली बदने व भुराज बदने यांनी एक आनोखे अभियान हाती घेतले आहे.ग्रामीण भागात तिरुपती बालजी तिर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याची प्रत्येक नागरीकास उत्सुकता असते.जो कोणी तंबाखू,विडी,सिगारेट,मद्यपान अशा सर्व व्यसनापासून एक वर्षभर दुर राहिल त्यास स्वखर्चाने तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यात येणार आहे.यासाठी दि.26 जानेवारी पर्यंत शपथ घेवुन नाव नोंदणी करावी लागेल.सरपंच वैशाली बदने व भुराज बदने या दाम्पत्याने सुरु केलेल्या या व्यसनमुक्ती अभियानास गावकर्यांचाही प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत 30 जणांनी व्यसनांचा त्याग करुन नावनोंदणी केली आहे.

व्यसनमुक्ती समितीची स्थापना मालेवाडी गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी सरपंच बदने यांनी रामकिशन बदने,ज्ञाधेश्वर बदने,आदिनाथ बदने,पाटलोबा बदने,महादेव बदने,सुभाष कसबे,संजय राठोड,भास्कर गित्ते या आठ जणांची व्यसनमुक्ती समिती स्थापन केली असुन व्यसन सोडणार्या गावकर्याने समितीसमोर शपथ घेवुन नावनोंदणी करावयाची आहे.मालेवाडीच्या सरपंच वैशाली बदने व भुराज बदने यांच्या या अभियानाचे कौतुक होत आहे.