समाज हितासाठी पत्रकारांनी आपली लेखणी चालवली पाहीजे – पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16नोव्हेंबर):-पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर हा समाज हितासाठी करणे फार गरजेचे आहे असे मत दिनांक 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन गंगाखेड याठिकाणी पत्रकारांचा आगळावेगळा सत्कार करण्यात आला.

पुष्पहार ,टोपी, रुमाल देऊन सत्कार हा वेगळा सत्कार होता.
यावेळी पत्रकार शंकर इंगळे, महालिंग भिसे ,सुनील कोनार्डे, रमेश कातकडे ,भीमराव कांबळे ,शिवाजी कांबळे ,अजित गणाचार्य ,सय्यद गौस, गुणवंत कांबळे, बाळासाहेब जंगले ,भागवत जलाले,अनिल साळवे बाळासाहेब कदम ,उत्तम आवंके , रोहिदास लांडगे ,मिलिंद रायभोळे तुषार उपाध्याय, मोसिन खान ,देवानंद गुंडाळे राजपाल दुर्गे हे उपस्थित होते.

पत्रकारांच्या लेखणी मुळे पत्रकार स्वतः घडतो त्यानंतर समाज घडतो समाजाबरोबर राष्ट्र आणि राष्ट्र बरोबर देश या ठिकाणी घडला जातो. त्यामुळे पत्रकारांची लेखणी हे समाज उपयोगी लेखणी असावी असे प्रतिपादन यावेळी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी केले.

टोपी, रुमाल , पुष्पहार या आगळ्यावेगळ्या सत्कार कार्यक्रमा मुळे पत्रकार बांधवांच्या वतीने वसुंधरा बोरगावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले .यावेळी पोलिस कर्मचारी प्रवीण कांबळे ,जावेद पठाण, चौधरी, आयुब, जगन्नाथ शिंदे ,प्रल्हाद मुंडे आनंता डोंगरे, विकास जोंधळे, अंबट यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.