एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडात गुरुवारी कीर्तन सोहळा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.16नोव्हेंबर):-मागील पंधरा दिवसापासून आपल्या मागण्या साठी बस स्थानकात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवारी दुपारी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव च्या वतीने किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे यासाठी गंगाखेड येथे कर्मचारी आंदोलनास बसले आहेत. आज पर्यंत महाराष्ट्रातील 35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत.

यामुळे सर्वच कर्मचाऱ्याचे कुटुंबीय भयभीत झालेले आहेत. कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांना मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी श्री संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव यांच्यावतीने गुरूवारी 18 नोव्हेंबर रोजी हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 ते 1 ह भ प तुळसिदास महाराज देवईमाय व 1 ते 2 ह भ प रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांचे कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तन सोहळ्यास परिसरातील भाविक भक्त, एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबीय, बस चे प्रवासी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन या किर्तन सोहळ्याचे संयोजक, सखाराम बोबडे पडेगावकर, गजानन जोशी, सोपानराव टोले, ग्राहक पंचायतचे सचिव मुंजाभाऊ लांडे , माजी सरपंच जयदेव मिसे, नारायण घनवटे , गणेश टाक , विजय खा, राम भोळे, गजानन पारवे आदींनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED