पुन्हा एकदा नगराध्यक्ष योगिता पिपरे झाल्या अपात्र…

27

🔸गैरव्यवहार प्रकरणी नगरसेवक माफ करणार तरी किती.??

🔹शहरातील नागरी विकास कामातही लाखोंच्या घोटाळ्यात योगिता पिपरे सहभागी??

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.16नोव्हेंबर):-गडचिरोली येथील नगरपरिषदेची एक हाती सत्ता मिळवून नगराध्यक्ष पदी भाजपाच्या विराजमान होणाऱ्या योगिता पिपरे यांच्या वर पुन्हा आपल्या खाजगी वाहनात डीजल भरण्यासाठी नगर पालिकेच्या तिजोरीतून पैशे खर्च केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून आज अखेर दि. 16/11/2021 रोजी नगर विकास खात्याचे मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ( शिवसेना या राजकीय पक्षाचे) एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा गडचिरोली नगर परिषदेच्या योगिता पिंपरी यांना नगराध्यक्ष या पदावरून पायउतार केल्याचे अधिकृत आदेश काढले असल्याचे अधिकृत वृत्त हाती आले आहे.

गेल्या महिन्यात योगिता पिपरे यांनी अपात्र आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल केली होती. तेंव्हा न्यायालयाने पुन्हा एकदा १३ ऑक्टोंबर ला सुनावणी घेऊन सुधारित आदेश २७ ऑक्टोंबर पर्यंत देण्याचे आदेश दिले होते. परंतू उशिरा का होईना न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याची चाहूल लागताच नगर विकास विभागाच्या वतीने आज नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.सदर आदेशाबद्दल सविस्तर माहिती मुख्य अधिकारी नगर पालिका गडचिरोली यांचे कडून जाणून घेतली असता,त्यांनी योगिता पिपरे यांना नगर विकास खात्याचे मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत आदेश मिळाले असल्याचा दुजोरा दिला आहे.