स्व.कमलेश पोपट यांच्यावरील हल्ल्याचे CCTV फुटेज पाहिले असता दरोडेखोर नराधमांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसत नाही- आमदार श्र्वेताताई महाले पाटील

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.17नोव्हेंबर):- बुलढाणा जिल्हा मधील चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील मुख्य रस्त्यावरील आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात  दि. 16 नोव्हेंबर च्या रात्री 9:45 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी 02 दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याने चिखली शहरातील प्रसिध्द व्यापारी स्व कमलेश पोपट यांचे त्यात निधन झाले आहे. या घटनेचा आमदार श्र्वेताताई महाले – पाटील यांनी जाहीर धिक्कार केला तसेच स्व. कमलेश पोपट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आमदार श्र्वेताताई महाले यांनी पोपट कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ति देवो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली.

चिखली शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून आघाडी सरकारच्या काळात जिकडेतिकडे लूटमार सुरू असल्याचे चित्र आहे . अशा घटना राज्यभरात घडत आहे . मागे काही दिवसांपूर्वी भाजपाचे जेष्ठ नेते मा सतिशजी गुप्त यांच्यावर औरंगाबाद नाशिक रस्त्यावर प्राणघातक हमला होऊन त्यात ते जबर जखमी झालेले आहे . तसेच भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित तसेच काल परवा शामभाऊ वाकदकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण चिखली शहरवासी दहशतीत आहेस्व.कमलेश पोपट यांच्यावरील हल्ल्याचे CCTV फुटेज पाहिले असता दरोडेखोर नराधमांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसत नाही एव्हढे ते सराईत वाटत आहे.

त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची वेळ आणि हे अत्यंत वर्दळीचे असतांना हल्लेखोर किती निर्ढावलेले होते हे सिद्ध होते.त्यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ चिखली शहर आज बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी बंधूनी घेतलेला आहे . त्यास माझा पाठिंबा आहे.शहरात पुन्हा अशा घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाने तातडीने यादृष्टीने पाऊले उचलली पाहिजे .यातील आरोपींना तातडीने जेरबंद करून कठोर शिक्षा करावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन कठोर पाऊले उचलावी लागतील