गंगाखेडचे नगर अध्येक्ष विजयकुमार तापडिया यांचा शहराच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश- बनला चर्चेचा विषय

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17नोव्हेंबर):- नगर परिषद नगर अध्येक्ष यांनी राष्ट्रीय काँग्रेस कडून जनतेतून अध्येक्षपदाची निवडणूक लढवून राष्ट्रीय काँग्रेस च्या हाताचा पंजा हे चिन्ह घेवुन निवडून आले असता गेल्या साडेचार वर्ष पेक्षा जास्त काळ झाल्या नंतर पक्ष बदलून जाणे हा निर्णय गंगाखेड शराच्या विकासाचा विषय असू शकतो का?गेल्या साडेचार वर्ष पेक्षा जास्त काळ झाला असता या काळात गंगाखेड शहराचा विकास बंद होता का? असे अनेक विषयावर गंगाखेड शहरात जनतेची चर्चा होताना दिसते.

काँग्रेस पक्षाने स्व.रतनलाल तापडीया यांना संधी दिली संधीच सोने करून शेवटचा श्वासा पर्यत काँग्रेस सोबतच होते. परंतु त्यांचाच पुण्याईवर नगराध्यक्षपदी विराजमान झालेले विजयकुमार तापडीया यांनी मात्र स्व.रतनलाल तापडीया यांच्या सारखे संधीचे सोने करता आले नाही असे काय घडले कि त्यांना शिवसेने प्रवेश करण्यास भाग पडलेअसून गेल्या साडेचार वर्ष पेक्षा जास्त काळ मध्ये जे कामे झालेत तो विकास नव्हे का? आसा प्रश्न जनते मध्ये चर्चेचा विषय बनला असून राहिलेल्या काळा मध्ये गंगाखेड शहराचा विकास करणार असे ठरवून आपण शिवबंधन बांधले.

शहरात स्वच्छतेचे तिन तेरा प्रत्येक प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचे उदा गंगाखेड तहसील समोर नाली घाण पाणी रोड वरून वाहत आहे या पाण्यामुळे लोकांना चालणे अवघड बनले आहे एखादे वाहन आले तर ते घाण पाणी अंगावर येते याचा त्रास जनतेला सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे आहे. या दुर्गंधी मुळे शहरातील नागरिकांनचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नकारता येत नाही.गंगाखेड नगरपरिषदचे व्यापारी संकुलने मोठया प्रमाणात असल्याने नगरपरिषदला मोठा कर मिळतो. विकास कामांसाठी मोठ मोठा निधी मिळतो पण विकास कामे का केली गेली नाही असा प्रश्न निर्माण करून जनता चर्चा करत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED