गेवराई तालुक्यातील गोळेगावात उसाच्या फडात जाऊन मजुरांचं कोरोना लसीकरण

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.17नोव्हेंबर):-तालुक्यातील गोळेगाव परिसरात, ऊसाच्या फडात काम करणाऱ्या मजुरांचे, फडात जाऊन कोविड लसीकरण सुरू केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक होत असल्याने, डॉ. वसंत पवार यांनी प्रत्येक गावात जाऊन लसिकरण मोहीम सुरु केली आहे. गेवराई तालुक्यातील गोळेगांव येथील शेतात जाऊन, डॉ. वसंत पवार, डॉ. वृषालीताई , डॉ. गुळे मॅडम, अनिल काळे यांच्यासह आशा कार्यकर्त्यां अन् अंगणवाडीताई यांनी या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मागीत काही काळात कोरोना रुग्ण कमी होत आहेत.

त्यामुळे राज्यात सर्व आस्थापना सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर कोरोना लसीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात कोरोना लसीकरण वेगात सुरु आहे. शहरी भागात लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत परंतु राज्यातील ग्रामीण भागात लसीकरण पाहिजे तेवढं होत नाही. त्यामुळे प्रशासन वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. काही जिल्ह्यात कोरोना लस घेतली नाही तर राशन मिळणार नाही तसेच नो व्हॅक्सीन नो एन्ट्री असे नियम लावले जात आहेत. त्यामुळे लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED