बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांचे कामगिरीचा धडाका चालुच

🔹बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

✒️फलटण(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

फलटण(दि.१७नोव्हेंबर)::- बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस पाठलाग करून अटक आज अटक केली.ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं.१२/२०२० आय.पी.सी.कलम.३६३,३६६, ३७६(२)(एन),२१२,३४ बालकांचा लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधिनीयकम २०१२ चे कलम ४,६,१७ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे संदिप धनाजी भोसले रा.निंबळक ता.फलटण जि.सातारा हा गुन्हा घडले पासून सुमारे दोन वर्षापासुन फरार होता.

मा.श्री.अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो.सातारा व श्री.अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सो.सातारा यांनी जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडणे बाबत शोध मोहिम राबविलेने श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सोा.फलटण, श्री.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांनी पाहिजे फरारी आरोपी पकडणे बाबत अक्षय सोनवणे
सहा.पोलीस निरीक्षक यांना आदेश दिला होता.

अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक तसेच गणेश अवघडे पोलीस अंमलदार व चालक यादव पो.हया.ब.नं.९७८ असे रात्रगस्त करीत असताना अशाय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक यांना गोपनिय बातमीदार मार्फत सदर फरारी आरोपी हा त्याचे राहते घरी येणार असलेची माहिती मिळालेने सदर आरोपी यास पकडणे करीता मौजे बाजेगाव ता.फलटण गावचे हद्दीत सापळा रचुन सदर फरारी आरोपी यास पकडणेचा प्रयत्न केला.

असता सदर आरोपी हा पोलीस गाडी पाहून तेथुन परतुन जावू लागताच अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक तसेच गणेश अवघडे पोलीस अमलदार यांनी सदर फरारी आरोपीचा २ किलो मिटर सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास मोठया शिताफीने पकडले. सदर गुन्हयाचा पुढील तपास अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सो.फलटण,श्री.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक, चालक यादव पो.हवा.घ.नं.९७८ व गणेश अवघडे पो.कॉ.ब.नं.२५०१ यांनी केलेली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED