कोळीवाडा गावठाणात शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे विरुद्ध लोकनेते दि बा पाटील असा वैचारिक संघर्ष रंगणार?

शिवसेना राजकीय पक्ष , हा ओबीसींच्या जमीन हक्क,आरक्षण,शिक्षण आणि प्रबोधनाच्या विरोधातील वैदिक मनुवादी हिंदुत्ववादी विचार का ठरतोय?प्रबोधनकार मा केशव सीताराम ठाकरे, या आपल्या आजोबांच्या विचारांना, ठाकरे परिवारातील वारसदारांनी घटस्फोट का दिला?आगरी कोळी भंडारी ओबीसींच्या गावठाण जमीन हक्क चळवळी ,अन्य ओबीसी एससी एसटी या जातींना एकत्र येऊन लढण्याचा विषय का ठरतोय?2016/17मध्ये महाराष्ट्र सरकारने कोळीवाडा गावठाणांना गलिच्छ वस्त्या म्हणजे SRA घोषित केले.
महाराष्ट्रातील बदलत्या जमीनदार सरंजामी सत्तेच्या स्वभावाचे ,ओबीसी मुबंई वर पडलेले काळेकुट्ट सावट होते.हिंदुत्वाच्या नशेत धुंद झालेल्या ओबीसी नेतृत्वाला जागे करण्यासाठी शेजारच्या नवी मुबंई उरण पनवेलच्या लोकनेते दि बा पाटील या आधुनिक वैद्याची गरज होती.मुबंई ठाणे पालघर येथील भूमीपुत्रांच्या आदिवासींच्या जमिनीची लूट मराठा ब्राह्मण गुजराती व्यापारी उद्योजकांनी (लोढा)चालवली होती.

आमचे “गावान लोढा आला।।
आता दारूला सोडा आला।।।
आमचे कमरेला घोडा आला।।

आमच्याच आगरी कोळी कवी गायक सांस्कृतिक मंडळींनी या परिस्थितीचे यथार्थ वर्णन केले आहे.त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.अर्थात यातील प्रबोधनाचा अर्थ महत्वाचा नाहीतर दारुतला सोडा बुडविणार??पुस्तके न वाचणारा,भाषणे न ऐकणारा,प्रबोधन सभा न करणारा इथला ओबीसी लग्न हळदी समारंभातील गाण्यावर ताल धरून नाचतो आणि मुबंई महाराष्ट्रही नाचवतो.आगरी कोळी गीते ही महाराष्ट्रातील नृत्य संस्कृती, ब्राह्मणी साहित्यिक आणि नाट्यसंगीताला आडवी करणारी कोळीवाडा गावठाण कल्चर आहे.

“मी हाय कोळी” ह्या गाण्याने जगातील सर्वात बलाढ्य सत्ताधीश,अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नाचवले.ही ताकद या मातृसत्ताक एकविरा संस्कृतीत आहे.अर्थात यातील स्त्रिया आणि मच्छिमार शेतकरी हक्कांचा विषय संपल्यानंतर काय होते? हे मुबंई लाSRA घोषित केल्यावर लोकांना समजले?

कोळीवाड्यात गावठाणात सोडा ,आमच्या कुलाबा कोळीवाड्याच्या विस्तारित गावठाणात, विधिमंडळ खेळणाऱ्या केस पांढरे झालेल्या, एकाही ओबीसी आमदार ,मंत्री आणि सर्वपक्षातील मागास कार्यकर्त्याला हा ओबीसींचा घोर अपमान आहे असे वाटले नाही ?
ही मुबंई च्या शिवसेनेच्या हिंदुत्वाची नशा आहे.
अर्थात कोरोना साथीत लोक रस्त्यावर मरत असताना, दवाखाने काढण्याऐवजी मंदिर निर्माणाची “उंची नशा” देणारे मा पंतप्रधान (गुजराती) नरेंद्रभाई मोदी यांचा नशैली” चहा “सुद्धा तेवढाच भारी आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील हे अशी वैदिक हिंदुत्वाची नशा न करता लोकांच्या हक्क अधिकारांसाठी प्रबोधन करीत होते.त्यांची पुस्तके कोळीवाडा गावठाणात वाचली गेली, तर फुले शाहू आंबेडकर हे ही मंत्रालय ते कुलाबा या परिसराला समजू शकतात.

अर्थात कोळीवाडा मंत्रालयाला जे समजेल तेच मुबंई महानगर पालिकेच्या कोळीवाडा गावठाण खायला निघालेल्या एसआरए बिल्डर आर्किटेकत यांच्यातील “वाघानाही” शिकविता येईल.

या हिंदुत्वाच्या नशेमुळेच मुबंई विधानसभा गाजविलेले लोकनेते दि बा पाटील आम्हाला कळले नाहीत.
येथील मूळ मुबंई कर अखिल कोळी परिषदेचे संस्थापक भाऊसाहेब राऊत यांनी दिल्ली ते मुबंई लोकसभा विधानसभा, आमच्या साठी गाजविली होती.

महाराष्ट्राच्या इंग्रज काळातील विधानमंडळ सभागृहात कुळ कायद्यांचा मूळ मसुदा रस्त्यावरची चरी अलिबाग येथील खोती विरोधी आंदोलन करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर नारायण नागु पाटील समजले नाहीत.

आज “कुळ कायदा “सोन्या चांदीच्या ताट वाटी चमच्यातून दूध पिणाऱ्या मा पंतप्रधान इंदिरा गांधींनी बनविला असे आमच्या भोळ्या कोळी भगिनी सांगत आहेत.त्यांनाही कुणीवाघाची मावशी मामा, पंढवत असावे?अहो कुळ कायदाच काय अख्खे संविधान आमच्या मागासवर्गीय शेतकरी कुळे, जमिनी पाणी,जगलं यांचे रस्त्यावरचे लढे लढणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेय.

इंदिरा गांधी या भारताचे पहिले पंतप्रधान मा.पंडित जवाहरलाल नेहरू या गर्भ श्रीमंत काश्मिरी ब्राह्मण पंडिताच्या पोटी जन्मल्या होत्या.
कश्मीर मधल्या शेतात राबणाऱ्या शेतमजूर कुळांना जमीन मालकी नाकारण्याचे महापाप या उच्चवर्णीय ऐतखाऊ खोत सावकार पंडित ब्राह्मणांनी केले नसते?
तर त्यांना कश्मीर सोडायची वेळ आली नसती??
आमच्या रेवदंडा अलिबाग येथील भूमिपुत्र मुस्लिम विचावन्त अब्दुल कादर मुकादम यांनी हे सप्रमाण सिद्ध केलेय.
देशातील शंकराचार्य आणि हिंदू विद्वानांच्या या मागास वर्गीयांच्या छळ कपटामुळे शोषणामुळे अनेक शोषित हिंदू जातींना इतर धर्मात धर्मांतर करावे लागले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 1956 चे बौद्ध धर्मांतर हे देशाचे डोळे उघडणारे धर्मातर आहे.

कश्मिरी पंडितांप्रमाणेच हिंदू कुळे -आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी यासह बारा बलुतेदार याना जमीन मालकी नाकारणाऱ्या उच्चवर्णीय खोत ब्राह्मण मराठा सावकारांना खोती विरोधी चळवळीने कोकण सोडावे लागले होते .

हा अलीकडचा इतिहास आहे.याचे नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी कोळी नेते नारायण नागु पाटील यांनी
केले होते.

कश्मीर पंडित यांना हाकलून देणारे मुस्लिम हे हिंदूविरोधी आहेत हे अर्धसत्य सांगितले जाते. ब्राह्मण पंडित हिंदू मागास जातींना जमीन पाणी जगलं यांचा मानवी अधिकार नाकारत .त्यामुळं अनेक धर्मातर झाली.
आजचे देशातील बहुसंख्य मुस्लिम ख्रिशन हे मूळ हिंदूच आहेत.
मुबंई चे विद्यमान पालकमंत्री माझे मित्र अस्लम शेख साहेब देशात आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववाद्यांची सत्ता असतानाच महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या उंची पर्यत पोहचलेत ! हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय आहे.

आम्ही मात्र कोळीवाडे गावठाणे खाणाऱ्या एसआरए समर्थक शिवसेनेच्या हिंदूविरोधी प्रेमात आकंठ बुडालोय.

सागरपुत्र आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी आज मुबंईचा महापौर,पालक मंत्री होऊ शकत नाही ?
तो पराक्रम मा अस्लम शेख या अस्सल मुस्लिम भावाने करून दाखविलाय, त्यांचे कोटी कोटी टाळ्यानी अभिनंदन आहे.आतातरी आमचे डोळे उघडतील का?

हिंदू कोळीवाडे गावठाणे झोपडपट्ट्या यांना गलिच्छ वस्त्या” SRA”ह्या कांन फाटणार्या शिव्या खाऊनही सीकेपी मराठा ब्राह्मण गुज्जू भाई वैश्य यांचे आमच्या विरोधातील राजकारण ओबीसींना समजत नसेल? तर पुन्हा 1962 मध्ये जाऊया!

आज कोळीवाडा गावठाण जमीन हक्क चळवळीतील स्वयंसिद्ध, ज्येष्ठ नेते विजय वरळी कर जेथे राहतात, तेथील वरळी कोळीवाडा येथील जमीन मालकी न्यायालयातून सिद्ध करण्यात येथील भूमिपुत्र यशस्वी झालेत.
तेथेही आमदार आदित्य ठाकरे असताना मच्छिमारी संपविणारा कोस्टल रोड होतो.
कोळीवाडे गावठाणे मासळी मार्केट मागच्या दाराने विकणारे आर्किटेकत पर्यावरण वादी आपल्या बगलबच्चे घेऊन लोकांची दिशाभूल करतात हे लोकांच्या लक्ष्यात येऊ लागलेय.

1962 मध्ये मूळ मुबंईकर अर्थात वरलीकर श्रीमान वासुदेव वरळीकर हे मागास वर्गीय ओबीसी कोळी समाजातील पहिले महापौर होते.त्या अगोदर सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रिन्सिपल बोऱ्हाडे हे मागासवर्गीय महापौर होते.

वारकरी असलेले वासुदेव वरलीकर अर्थात बाबासाहेब वरलीकर हे स्वातंत्र्य सैनिक होते.आज आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणाऱ्या कंगना राणावती अवतार धारण केलेल्या उच्चवर्णीय महिला आमच्या मागास वर्गीय जमीन हक्कांचा संघर्ष जाणत नाहीत म्हणूनच सीमांकन गावठाण हक्क त्यांना समजत नाहीय.
कोळीवाड्यांची गावठाणाची एसआरए होणार अशी त्यांची मांडणी आहे.आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी हे जमीन मालकी असल्यावर राज उद्धव ठाकरे बंधू यांच्या मातोश्री, कृष्णकुंज यांच्यासारखे बंगले बांधून राहू शकतात हे त्या का सांगत नाहीत?.

आज शाकाहारी वारकऱ्यांचा आणि ब्राह्मण पुजाऱ्यांच्या ताब्यातील, बडव्यांचा विठ्ठल सर्वांना परिचित आहे.

परंतु हातात कोणतेही शस्त्र न घेता संविधानिक लोकशाही प्रमाणे निशस्त्र अहिंसावादी विठ्ठल मूर्तीच्या कानात मकर कुंडले आहेत.
सोप्या मराठी बोली भाषेत मासे रुपी कानातले अलंकार हे मच्छिमार भावांचे बहिणींचे विठ्ठल प्रेम ,शुद्ध शाकाहारी महाराष्ट्राला कळावे म्हणून वरळी कोळीवाड्यातून पंढरपूरला जाऊन ,ब्राह्मण बडव्यांचा वेढ्यातून विठ्ठलाला स्वातंत्र्य देणारे ,मुक्तता देणारे बाबासाहेब वरलीकर हे होते.
अखिल कोळी परिषद संस्थापक ,शेकापचे संस्थापक भाऊसाहेब राऊत यांचे सहकारी होते.याच अखिल भारतीय कोळी परिषदेचे माजी अध्यक्ष महामहिम भारताचे राष्ट्रपती मा रामनाथ कोविंद आहेत.

राजकीय सत्तेच्या इतिहासात तसूभरही कमी नसलेल्या या सागरपुत्र ओबीसी समाजाला जमीन हक्कासाठी 1984 ला सिडको विरोधात लढताना आज पाच हुतात्मे द्यावे लागतात.
सिडको नवी मुबई विमानतळाच्या नामकरण लढ्यात सरंजामी मराठा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या शिवसेना नेत्याच्या आणि सिडको एमडी संजय मुखर्जी यांच्या अरेरावी मुळे मरणोत्तर लढा द्यावा लागला.हा लढा भूमिपुत्र आगरी कोळी कराडी भडाऱ्यांनी एससी एसटीनि जिकला.यातील आरमारी सागरपुत्र शक्तीने मुबंईस 200 कोळीवाडा गावठाणांना उच्चवर्णीय हिंदुत्वाच्या हुकूमशाहितुन मुक्त करून आम्हास जमीन मालकी द्यावी !अशी मुबई ची मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी अल्पसंख्यानक जनता आव्हाहन करीत आहे.

✒️सुलोचनापुत्र.:-राजाराम पाटील.कोळीवाडा गावठाण हक्क चळवळीचे प्रवर्तक.बेदखल कुळांच्या आंदोलनातील अभ्यासक(मो:-8286031463)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED