हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिना निमित्त “शिवालयात” अभिवादन

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.18नोव्हेंबर):- महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे अमोघ वक्तृत्वाचे धनी, परखड लेखक, महान व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मा.आमदार विजयराजजी शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय “शिवालय” येथे स्मृतिदिनी निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे भाजपा महिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष सौ.सिंधुताई खेडेकर व मा.नगराध्यक्ष श्री.विठ्ठलराव येवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन व आदरांजली अर्पण केली.

मा.बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी कधीही कुठेही तडजोड केली नाही. राजकारण, सत्ताकारण या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याची किमया करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन देण्याचे काम केले. त्यांच्या विषयी जनसामान्यांच्या मनात आजही तोच आदर कायम असून त्यांच्या स्मृती कायम स्मरनात राहतील असे मत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी अभिवादन कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस यश तायडे,शहर सरचिटणीस अनंता शिंदे, शहर अनुसूचित मोर्चा सरचिटणीस बाळू ठाकरे,अण्णा पवार,संतोष कानडजे,किसान मोर्च्या तालुकाध्यक्ष सुभाष जगताप, दत्ताजी शिंदे,भाजपा तालुका उपाध्यक्ष अमोल जाधव, अशोक बाहेकर,अशोक सुसर यांसह मान्यवर उपस्थित होते.