एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण केल्याशिवाय संपातून माघार नाही , तडवळे ग्रामस्थांचा एस.टी कर्मचारी संपास जाहीर पाठींबा

27

✒️तडवळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

तडवळे(दि.18नोव्हेंबर):- दिनांक 28 ऑक्टोंबर 2021 पासून राज्यभर चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला तडवळे , ता.खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला. महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दाबण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात. तडवळे ग्रामस्थांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी एसटी कर्मचारी संपास जाहीर पाठींबा दिला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करु नये

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्यकर्त्यांनी घेतलेली नाही अनेक कर्मचाऱ्यांनी संपाच्या अटीमान्य होण्यासाठी प्राणाची आहूती दिलेली असतांना डोळे झाकून गप्प बसणाऱ्या सरकारला जाग येत नाही ही दुर्देवी बाब आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आमच्या तडवळे ग्रामस्थांचा जाहिर पाठींबा असून प्रसंगी एसटी कर्मचाऱ्याच्या न्यायहक्कासाठी आम्ही संपात सहभागी होवू. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज पर्यंत न्यायहक्क मागण्यासाठी ४१ कर्मचाऱ्यांनी प्राण गमावलेले आहेत तरीही ठाकरे सरकार गप्प असल्यामुळे सर्वसामान्य जनता एसटी कर्मचाऱ्याबरोबर असल्याचे ग्रामपंचायत सदस्य श्री.शरद पाटील यांनी यावेळी म्हटले.

युवा नेते ग्रामपंचायत सदस्य श्री.शरद पाटील

 

जोपर्यंत एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी गोड गेली नाही. एसटीची दुरावस्था असूनही कर्मचारी काम करत आहेत. आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी खूप अन्याय सहन केला . आता येथून पुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील नेते , मंत्री यांनी सत्तेत यायच्या अगोदर घोषणा केल्या होत्या की आम्ही सत्तेत आल्यावर एस.टीचे विलीनीकरण करू पण हेच महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री गप्प बसले आहेत. अजून किती एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्त्या केल्यावर सरकारचे डोळे उघडणार. जोपर्यंत एसटीचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू.

श्री.सचिन खाडे ( चालक )

 

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही

महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा अंत बघत आहे. पण आम्ही कर्मचारी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. इतर राज्यात एसटीचे विलीनीकरण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण का होऊ शकत नाही ? महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कितीही दबाव टाकला तरी एसटीचे विलीनीकरण झाल्याशिवाय एसटी कर्मचारी संपातून माघार घेणार नाहीत.

श्री.नितीन पळे ( वाहक )

एसटी कर्मचारी संपास जाहीर पाठींबा देत असताना श्री. धनंजय साबळे ( जॉबरशेठ ) , पत्रकार श्री.जे.के काळे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आभार श्री.विजय पळे साहेब यांनी मानले.

या कार्यक्रमाला युवा नेते ग्रामपंचायत सदस्य श्री.शरद पाटील , श्री.बाबूराव मदने , श्री.शंकर साबळे , पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके , पत्रकार श्री.जे.के काळे , श्री.धनंजय साबळे ( जॉबरशेठ) , श्री. नितीन पळे , श्री. नारायण साबळे , श्री.विजय पळे साहेब , श्री.सचिन खाडे , श्री.श्रीमंत बिडवे , श्री.सचिन साबळे , श्री. गणेश पाटोळे , श्री.महेश काळे, श्री.राजेंद्र साबळे, श्री.चंद्रशेखर साबळे, श्री.जालिंदर ढोले, श्री.विजय जाधव , श्री.राजकुमार पळे , श्री.संतोष साबळे , श्री.अभिजीत साबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.