अर्हेर-नवरगाव अवैध्य वाळू वाहतूक तस्करीला आहे ऊत, संबंधित अधिकारी वर्ग चूप आणि महसूल विभाग खात आहे धूळ…

🔹वर्षोंनी वर्षे उलटली पण अवैध्य वाळू तस्करी वर प्रतिबंध का नाही?

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18 नोव्हेंबर):- तालुक्यातील अर्हेर – नवरगाव लगत वैनगंगा नदी पात्र असून इथे मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू उत्खनन केल्या जाते.परंतु या नदी पत्रात कोणत्याही प्रकारचा वाळूचा लिलाव झाला नसून सुध्दा खुल्या बदमाश सांडा प्रमाणे वाळू तस्कर अवैध्य वाळूचे उत्खनन करीत आहेत.ही वाळू चोरीची असून महसूल विभागाचा लाखो – करोडो रुपयांचा नुकसान होत आहे. वाळू तस्कर बेधुंद अश्या वेगाने अवैध्य वाळूचे ट्रॅक्टर रोडानी चालवीत असतात. या वेगवान ट्रॅक्टरने ये – जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व बाजारपेठेत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला क्षनोक्षणी धोक्याची घंटा वाजत असते.या अगोदर सुध्दा ट्रॅक्टरने जीवहानी झालेली आहे. पुन्हा जीवहानी झाली तर संबंधित अधिकारी वर्ग जवाब देणार काय असे सामान्य जनतेस वाटत आहे.

रस्तेच्या कडेनी जागोजागी गावात व गावाच्या बाहेरील भागात अवैध्य वाळूची साठवणूक करून ती वाळू अवैध्य रित्या विकल्या जाते. मग संबंधित अधिकारी वर्ग नजर अंदाज का करीत आहेत हा एकच प्रश्न निर्माण होतो.अधिकाऱ्यांची शक्ती त्यांचा अधिकार खरंच अवैध्य वाळू तस्करांनी विकत घेतला की काय हा प्रश्न निर्माण होतो. तरी सुध्दा जनसामान्यांचा विश्वास संबंधित अधिकारी वर्गावर टिकून आहे. या जनसामान्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने अवैध्य वाळू उत्खनन थांबवून कायदेशीर कार्यवाही करून अवैध्य वाळू उत्खनन थांबवावे व सरकारचा महसूल वाचवावा आणि त्रस्त गावकरी जनसामान्यांना न्याय मिळवून द्यावा अशी जनसामान्यांची कडाडीची मागणी आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED