चकलांबा पोलीसांकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.18 नोव्हेंबर):-तालुक्यातील चकलंबा पोलीसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत, पस्तीस लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

यामध्ये एक जेसीबी आणि हायवा डंपरचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती चकलंबा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो. नि. भास्कर नवले यांनी, दि १७ रोजी दुपारी राक्षसभुवन येथील गोदापात्रात जाऊन पाहणी केली. या पहाणीदरम्यान एक जेसीबी हायवा डंपरमध्ये अवैधरित्या वाळू भरत होता. खुलेआम केल्या जाणाऱ्या वाळूच्या या तस्करी प्रकरणी, पोलीस निरीक्षक नवले हे कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचले. आणि दोन्ही वाहनांवर कारवाई करत सदरची वाहने ताब्यात घेतली.

या कारवाईत पोलीसांनी एक जेसीबी आणि हायवा असा एकूण अंदाजे ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच संबंधितांवर चकलंबा पोलीस ठाण्यात कलम 379, 188, 34, 511, 144 कलमानुसार गुन्हा नोंद दाखल केला आहे.