अपघातग्रस्त कुटुंबाना तात्काळ मदत जाहीर करा

🔸रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अक्कलकोट(दि.18नोव्हेंबर):– अक्कलकोट ते सोलापूर राज्य महामार्गावर कुभांरी गावाजवळ अवैध प्रवासी वाहतुक करणान्या जिप चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघाती मृत्यू मुखी व जखमी झालेल्या कुटूंबांना शासकीय मदत त्वरीत मिळणे बाबत . वरील विषयो आपणास निवेदन देऊ इच्छीतो की , राज्य परिवहन महामंडळाचे चालक व वाहक कर्मचारी यांनी एस . टी चे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी उभारण्यात आलेल् संपामुळे अनेक सर्व सामान्य जनतेला याचा तिव्र फटका बसत आहे.

तसेच काल अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गाव कुभांरी गावांजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणान्या जीप चालकाच्या निषकाळजीपणामुळे काल दिनांक 16/11/2021 रोजी अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू तसेच आठ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत . राज्य शासनाने एस . टी . कर्मचान्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणा वाहनांचा सध्या धुमाकूळ सुरु आहे . तसेच अव्वाच्या सव्वा दर प्रवाशाकडून घेतले जात आहेत . एस टी प्रवास सुरक्षीत प्रवास असुन अवैध प्रवासी वाहतुक मधुन प्रवास करणाच्या प्रवास्या ना कोणत्याही प्रकार सुरक्षितता दिली जात नसल्याने सर्वसामान्य नागरीकांना आपले अनमोल जिव गमवावे लागत आहेत.

तरी तात्काळ अपघातग्रस मृत कुटुंबाना तात्काळ २० लाख रुपये तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये तसेच सर्व जखमी रुग्णावर होणारा उपचार हा विनामूल्य करण्यात यावा असे निवेदन तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वात तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांना देण्यात आले यावेळी रिपाई यु ता अध्यक्ष अप्पा भालेराव शहर अध्यक्ष प्रसाद माने,तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड,जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, चंद्रकांत गायकवाड,रविराज गायकवाड, दत्ता कांबळे,गोरख धोडमनी, कृष्णा धोडमनी,गणेश कांदे,शुभम मडीखांबे,सैपन शेख, सुरेश सोनकांबळे,विनायक होटकर,सोहेल उस्ताद,प्रशांत होटकर,मारुती होटकर,लक्ष्मण होटकर,कल्याणी गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, अंबादास रामचंद्र गायकवाड, श्रीकांत गायकवाड, शंकर गायकवाड विशाल निकंबे,निगप्पा निबाळ,व अन्य उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED