वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18नोव्हेंबर):-एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठ्ठलाची वारकर्‍यांना दर्शन रुपी भेट घालून देण्याच कार्य एसटीचे कर्मचारीच करतात. म्हणून तमाम वारकरी एसटी महामंडळाच्या आंदोलका सोबत आहोत असा विश्वास संत देवईमाय संस्थांनचे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी गंगाखेड येथे मंगलवारी एसटी कर्मचाऱ्यां समोर कीर्तनात बोलताना केलं.एसटी महामंडळ चे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गंगाखेड एसटी आगार समोर कर्मचारी आंदोलनास बसले आहेत.

महाराष्ट्रात 35 च्या वर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना त्या मृत कर्मचाऱ्यांच्या आत्म्याला शांती लाभावी व इतर कर्मचारी आत्महत्येसारख्या वाईट विचारापासून दूर राहावेत यासाठी किर्तन सोहळ्याचे संयोजक, सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या संकल्पनेतून गुरूवारी कीर्तन सोहळा पार पडला. यावेळी संत तुळशीदास महाराज देवकर बोलत होते. एसटी कर्मचारी हे जनतेच्या दृष्टीने सर्वात विश्वासू कर्मचारी असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवूनच बसमध्ये बसताना प्रवासी निवांत आणि सुखी प्रवास करू शकतो. टपाल पाठवताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडे टपाल दिल्यानंतर आपण निवांत होतो. हे या कर्मचाऱ्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे .वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवून आणणारे कर्मचारी आज संकटात असताना आम्ही वारकर्‍यांनी या कर्मचाऱ्यांना साथ देणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं महाराजांनी आपल्या कीर्तनात सांगितले. यावेळी कीर्तनकार तुळशीदास महाराज यांचा सत्कार संत मोतीराम महाराज गोशाळेचे संचालक तथा किर्तन सोहळ्याचे संयोजक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सत्कार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल माजी सरपंच नारायणराव धनवटे, सोपानराव टोले, जयदेव मिसे, जयवंत कुंडगिर, मुंजाभाऊ लांडे, राम भोळे, रामेश्वर बचाटे ,कारभारी नीरस, गणेश टाक , विजयआप्पा खाकरे ,ह भ प शिवाजी महाराज बोबडे , प्रताप कुळकर्णी आदींचा महाराजांनी विशेष सत्कार केला. निखिल आया , बंडूसेठ कात्रे यांनी किर्तन स्थळी फराळाची व्यवस्था केली होती. ह-भ-प बर्वे महाराज, गोविंद मुंडे, ह भ प प्रभाकर महाराज बचाटे, नंदकुमार सिसोदिया ,किशन भंडारे ,गजानन पारवे आदीसह यावेळी एस टी महामंडळाचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय इतर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी कार्यक्रम स्थळ येऊन पाहणी केली.