म्हसवड रथयात्रेचा चेंडू जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18नोव्हेंबर):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत आसलेल्या माण तालुक्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी देवीचा वार्षीक रथोत्सव नगरप्रदक्षीना व यात्रा पटांगणावरील जागा व्यापारी वर्गाला भाड़े तत्वावर देऊन रथ ओढून यात्रा भरविण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना बरोबर जे कोण यात्रा भरवणार आहे त्यांनी हमीपत्र द्यावे त्यावर लवकरच जिल्हाधिकारी निर्णय देतील मात्र मंदिरातील परंपरागत चालत आलेल्या धार्मिक विधीला कोव्हीड १९चे कोणतेच निर्भबध नसले तरी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर पाळूनच धार्मिक विधी करावा मर्यादा प्रशासन सहकार्य करेल असे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांना यात्रा बैठकीत सांगीतले
कोव्हीड १९ मुळे २०१९, २०२० या दोन वर्षात रथ मिरवणुक झाली नाही यावर्षी कोव्हीडचा प्रदुर्भाव म््हसवड सह तालुक्यात नसल्याने रथोत्सव होणार अशी मानसिक भाविकाची झाली असताना आज गुरुवार दिनांक १८ रोजी प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, यांनी मंदिरातील व रथ पुजनाच्या परंपरागत चालत आलेल्या धार्मिक विधीला कोणते हि बंधन नहीं मात्र रथ मिरवणुक व यात्रा पटांगणावरील दुकानासाठी मा जिल्हाधिकारी यांची परवानगी महत्वाची असुन ती परवाणगी मिळवण्यासाठी गावस्वरुपी प्रयत्न करावा त्यास आमचे सहकार्य राहिल असे सुर्यवंशी, देशमुख यांनी सांगीतले.

सिध्दनाथ यात्रे संबंधी मंदिरात प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, तहसीलदार येवले,तालुका वैद्दकिय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, नगराध्यक्ष तुषार विरकर, सातारा जिल्हा बांधकाम विभागाचे अधिकारी, ट्रस्ट, रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने,, अॅड पृथ्वीराज राजेमाने बाळासाहेब राजेमाने ,गणपतराव राजेमाने, राष्ट्रीय काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,। एपीआय बाजीराव ढेकळे मुख्याधिकारी सचिन माने, मंदिराचे ट्रस्टचे चेअरमन हरीभाऊ गुरव, माळीसमाज्याचे मानकरी ,मोहनराव डुबल मानकरी ग्रामस्थ,व्यापारी व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंढरपुरची वारी झाली आत्ता म्हसवडची हि दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे भरली नसलेली यात्रा कोरोना नसल्याने यात्रा भरणार असे वाटत आसताना डिवायएसपी देशमुख व प्रांताधिकारी सुर्यवंशी या दोन अधिकार्यानी जिल्हाधिकारी यांच्या परवाणगी शिवाय रथ मिरवणुकीस परवाणगी नाही असे स्पष्टपणे सांगीतल्याने यात्रा। भरण्याचा चेंडू जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात टाकल्याने आत्ता म्हसवडकरांना जिल्हाधिकारी यांची भेंट घेऊन यात्रा भरवण्या संदर्भात चर्चेने प्रश्न सोडवणे गरजेचे आहे गत वर्षी कोव्हीडचा प्रदुर्भाव असताना पाली यात्रा गांव स्वरुपी भरवली, परवा कोपारडे हवेलीचा रथोत्सव झाला , पंढरपुरची वारी झाली मग गावस्वरुपी यात्रा भरु देण्यास प्रशासन का आडथळा आणत आहे माण खटाव मध्येच वेगळा कोव्हीडचा वेगळा न्याय का जिल्ह्यात इतर ठिकाणी प्रशासनाचा वेगळा नियम व म्हसवड रथोत्सव यात्रेला वेगळा नियम का असे अनेक प्रश्न रथाचे मानकरी अजितराव राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, माजी नगराध्यक्ष विलास माने ,तेजसिह राजेमाने, सोमनाथ केवटे, आदीनी मांडून मगच यात्रेसाठी रस्ते दुरुस्ती, आरोग्य, बस व्यस्था, लसीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, याविषयी मगच चर्चा करा असा सुर उपस्थीत नागरीकांनी केला.

कोणत हि यात्रा भरवण्याचा ठोस निर्णय न होता यात्रा नियोजनाची बैठक संपल्याचे प्रशासनाने सांगून बैठक रद्द केली
यावेळी कैलास भोरे, दिपसिंह राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, सुरेश म्हेत्रे, शहाजी लोखंडे, वैद्दकिय अधिकारी भारत काकडे ,डॉ देशमुख, तलाठी संतोष ढोले , पांडुरंग सरतापे, चंद्रकांत केवटे , राजेन्द्र पिसे,प्रा विश्वंभर बाबर, विकास गोंजारी,, आदी नागरीक , अधिकारी, व्यापारी उपस्थिती होते