






✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)
नासिक(दि.18नोव्हेंबर):- जीवे मारण्याची धमकी देत डोंगरावर घेऊन जात दोन अल्पवयीन मामे बहिणीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या एकस विशेष पोस्को न्यायालयाने न्यायमूर्ती देशमुख डी डी यांनी एकत्रित दहा वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली ही घटना 2017 मध्ये मार्कण्ड ऋषी डोंगरावर घडली होती याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियम पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता शांताराम मोहन माळी राहणार मोहाडी तालुका दिंडोरी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी एका पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली होती संशयिताने 21 ऑगस्ट 20 17 रोजी अल्पवयीन पीडितेच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत तिला दुचाकीवर चक्कर मारण्याचा बहाणा करून वनी नजीकच्या मार्कण्ड ऋषी डोंगरावर घेऊन जात तिला मारण्याची धमकी देऊन बळजबरीने बलात्कार करत होता त्यानंतर पीडितेवर त्यांनी वेळोवेळी बलात्कार केला तसेच सप्टेंबर 20 17 रोजी पीडितेच्या अल्पवयीन मामे बहिणीशी हा प्रकार केल्याने ही घटना उघडकीस आली होती भाचीने आप बीती कथन केल्याने पहिल्या पीडितेच्या आईने दोन्ही मुलींना सोबत घेऊन दिंडोरी पोलीस ठाणे गाठले याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दिंडोरी पोलिसांनी शांताराम माळी यास अटक करून त्यांची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करून दोन्ही गुन्हा चा एकत्रित खटला विशेष पॉस्को न्यायालय यात चालला सरकारतर्फे ऍड दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले न्यायालयाने साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दहा वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली दोन्ही गुन्ह्यात विविध कलमान्वये वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या मात्र शिक्षा या एकत्रित भोगा वयाचे आहे





