नागभीड येथे हिंदू हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.18नोव्हेंबर):-हिंदू हृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थित पार पडला.दिनांक १७ नोव्हेंबर रोजी नागभीड तालुका शिवसेनेच्या वतीने नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात हिंदू हृदय-सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला,यावेळेस बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प सुमनांजली अर्पण करण्यात आली.

सोबतच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करून स्नेहमीलन सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना ता. प्रमुख भोजराज ज्ञानबोनवार,शहर प्रमुख श्रीकांत पिसे उप-ता. प्रमुख मनोज लडके, गिरीश नवघडे, उप-शहर प्रमुख नंदू खापर्डे, ईश्वर नागरीकर, उप-विभाग प्रमुख प्रमोद राऊत, युवासेना प्र. अजित गोडे, माजी शहर प्रमुख विक्की मडकाम, शेखर फटींग अरुण खापरे,अमित अमृतकर, प्रशिल निमगडे, बंडू पांडव, परवेझ साबरी, खेकारे, शंकर म्हशाखेत्री, दामू चौधरी, बालू चिलमवार, तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED