मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

29

🔹२ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विकास कामांना सुरुवात !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.18नोव्हेंबर):-आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे निधीची मागणी केली. दरम्यान मोर्शी वरुड तालुक्याच्या व शेघाट वरुड मोर्शी शहराचा सर्वांगीण विकास व कायापालट करण्याचा संकल्प घेऊन आ. देवेंद्र भुयार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातच भरगॊस निधी खेचून आणला आहे . या निधि अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु असल्याने वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे.

यावेळी मोर्शी शहरातील दर्गा पुरा येथे “वैशिष्ट पूर्ण निधी अंतर्गत सभागृह कामांकरिता ३० लक्ष रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत मोर्शी शहरातील गिट्टी खदान ते कटीस्कर ते सोनवणे यांच्या घरापर्यंत काँक्रिट रोडचे बांधकाम कामांकरिता १ कोटी ६४ कोटी ४२ हजार रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. सत्यजित गवई ते बोरकुटे यांचे घरापर्यंत काँक्रीट रॉड बांधकाम करणे १७ लक्ष रुपये, अरुण देऊळकर ते ताजने यांच्या काँक्रिट रोड बांधकाम करणे २३ लक्ष रुपये, इदगाह समोरील ३० लक्ष रुपयांच्या सभागृह बांधकामाचे लोकार्पण यासह विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मोर्शी नगर परिषद येथील रस्त्यांची व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून मोर्शी शहरातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्फत वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत, सामाजीक न्याय अंतर्गत, आणि जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे मोर्शी शहरातील विकास कामांना प्रारंभ झाला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मोर्शी शहरामध्ये विविध विकास कामे होणार असून या विकास कामांना आमदार देवेंद्र भुयार यांनी प्राधान्य दिले आहे.यावेळी भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष मेघणाताई मडघे, उप नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, सभापती डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, नगरसेवक रवि गुल्हाने, नगरसेवक सागर ठाकरे, नगरसेवक दीक्षा गवई, विद्याताई ढवळे, क्रांतीताई चौधरी, नितिन पन्नासे, सूनिता कोहळे, नितिन उमाळे, नईम खान, मोहन मडघे, दीलीप गवई, विनोद ढवळे, अंकुश घारड, यांच्यासह मोर्शी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.