मोर्शी तालुक्यातील दापोरी गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल !

25

🔹दापोरी ग्राम पंचायत व आरोग्य विभागाचे यश : अफवांच्या पार्श्वभूमीवर ठेवलाल आदर्श !

🔸गट विकास अधिकाऱ्यांची लसीकरण शिबिराला भेट 

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.18नोव्हेंबर):-कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या विशेष सहकार्याने आरोग्य विभागाच्या पुढाकाराने दापोरी येथे टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. दापोरी गावामध्ये लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने दापोरी येथे व्यापक स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली.ग्रामीण भागात कोरोना लसीविषयी पसरलेल्या विविध अफवांच्या पार्श्वभूमीवर मोर्शी तालुक्यातील दापोरी गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. या गावाने इतरांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचे हे यश असल्याचे प्रतिपादन ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी यावेळी केले.

दापोरी येथे राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत गावातील १८ वर्षांवरील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. लसीच्या पहिल्या डोससाठी ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या डोससाठी १८ वर्षांवरील ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी दिली.
कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने ग्राम पंचायत कार्यालय दापोरी, तालुका आरोग्य प्रशासनाच्या पुढाकाराने दापोरी येथे युद्ध स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यावेळी लसीकरण शिबिराला मोर्शी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रवींद्र पवार यांनी भेट देऊन गाव १०० टक्के लसीकरण करण्याचे निर्देश दिले.

दापोरी येथील लसीकरण मोहिमेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, सरपंच संगीता ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई विघे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, ग्राम सेवक राजकुमार कोंडे, तालुका आरोग्य अधिकारी महाजन, हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कोरडे, डॉ अरविंद वानखडे, राजेंद्र चौधरी, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळींनी सहकार्य केले .

कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी दापोरी ग्राम पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. गावामध्ये लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम जनजागृती करून दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने दापोरी येथे व्यापक स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण शिबिरे घेण्यात आली —— रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य.